Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: आधी 'मेकअप'साठी घरी बोलवलं, मग चहातून दिलं गुंगीचं औषध; नागपुरात महिलेवर अत्याचार

नागपुरातील हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरी लग्नाचा कार्यक्रम आहे, असा बहाणा करत महिलेला चहातून गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Physical Assault on Woman: महिलेला चहातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहित संजय पांडे (वय ३१ रा. संतोषी मातानगर, पिपळा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२२ ला मोहित आणि पीडितेची भेट झाली होती.

ती ब्युटीपार्लर चालविते. त्यानंतर त्याने महिलेला घरी वधूचा मेकअपच्या बहाण्याने घरी बोलाविले. मात्र, घरातील सर्वजण बाहेर खरेदीसाठी गेल्याचे सांगून त्याने महिलेला चहा प्यायला दिला. चहा प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्याने तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने महिला शुद्धीवर आली असता, मोहित दारूसह एमडी घेताना आढळला.

त्यामुळे महिलेने त्याला विचारणा केली. मात्र, त्याने तिचे अश्‍लिल व्हिडीओ घेतल्याचे सांगून महिलेवर पुन्हा अत्याचार केला. महिलेने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगताच त्याने चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. जीवाच्या भीतीने तिने तक्रार दिली नाही. ऑक्टोबर महिन्यात मोहित याने पुन्हा महिलेला घरी बोलाविले. (Latest Marathi News)

चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो सतत महिलेचे शोषण करीत होता. महिलेच्या पतीला याबाबत कळाले. तेव्हापासून महिला मोहितसोबत राहायला लागली. महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला. मात्र, मोहितने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने पीडितेने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT