Nagpur Crime Esakal
नागपूर

Nagpur Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! मोठ्या भावाने हातोडीने केला लहान भावाच्या डोक्यावर वार, जखमी रुग्णालयात दाखल

दारूच्या नशेत मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता.१०) रात्री अकरा वाजताच्या सुमारास हुडकेश्‍वर पोलिस हद्दीतील पवनपुत्रनगर येथे उघडकीस आली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: दारूच्या नशेत मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता.१०) रात्री अकरा वाजताच्या सुमारास हुडकेश्‍वर पोलिस हद्दीतील पवनपुत्रनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली.

आकाश सरवन कनोजे (वय २०), असे जखमीचे तर मंगेश सरवन कनोजे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री ८ वाजता आकाश हा दारू पिऊन घरी आला आणि झोपला. त्यानंतर रात्री १०.३० वाजता मंगेशही दारू पिऊन आला आणि झोपला.

रात्री ११ च्या सुमारास मंगेश उठला आणि त्याने पलंगाखाली असलेला हातोड्याने तीन वेळा आकाशच्या डोक्यावर वार केले. आकाशने आरडा-ओरड केली. त्याची आई ललिता यांनाही जाग आली. त्यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकाशला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT