नागपूर

Nagpur Crime: खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक ! एक लाखाची मागितली होती खंडणी

कॅफेमध्ये शिरून एक लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करीत, अंबाझरी पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime News: कॅफेमध्ये शिरून एक लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करीत, अंबाझरी पोलिसांनी त्याला अटक केली. गुरुवारी (ता. २९) हा प्रकार उघडकीस आला. कॅफेचे व्यवस्थापक देवेंद्र उमराज पटले (वय २९, रा. पारधी नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मुश्ताक ऊर्फ मुन्ना पटेल (वय ४५, रा. महेश नगर, भुपेश नगर), असे तोतया पत्रकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या

माहितीनुसार, गुरुवारी (ता. २९) गोकुळपेठ परिसरात असलेल्या सोषा कॅफेमध्ये रात्री नऊ वाजताच्या सुमारास गेला. त्याने येथील व्यवस्थापक देवेंद्र पटले यांना धमकावीत पत्रकार असल्याचे सांगून कॅफेचे शुटींग करण्यास सुरुवात केली.

त्याला मनाई केली असता, त्याने मुस्ताक पटेल असे नाव सांगून, काही न छापण्यासाठी १ लाख रुपयाची मागणी केली. व्यवस्थापकाने घाबरून त्याला २० हजार दिले. यावेळी 'तेरे मालीक को बोल की, बाकी पैसे रेडी रखना' अशी धमकी देऊन निघून गेला. ही बाब त्याने मालकाला सांगितली.(Latest Marathi News)

शुक्रवारी (ता. १) कॅफेचे मालक अविनाश भुसारी यांना पटेल याने फोन करून एक लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली आणि खंडणीचीही मागणी केली. त्यांनी तत्काळ अंबाझरी ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली.

पोलिसांनी त्यांनी त्याला ताब्यात घेत, विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक केली असता, त्याच्याकडून ११ हजार २२० रुपये आणि विविध चॅनलचे ओळखपत्र जप्त केले असून अधिक तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT