Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Crime: महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली कुटुंबाला पाठवलं तुरुंगात, चोरट्यांनी घरात शिरुन उडवले १७ लाख

वस्तीतील महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठविल्यानंतर घरात चोरट्यांनी शिरून धाडसी चोरी करीत, १६ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास केला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur House Robbery: वस्तीतील महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठविल्यानंतर घरात चोरट्यांनी शिरून धाडसी चोरी करीत, १६ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (ता.२१) सांयकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरुणकुमार श्‍यामानंद त्रिपाठी (वय ५२,रा. वसंत विहार, खडगाव रोड, दत्तवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.

त्यांच्यावर वस्तीतील महिलेशी झालेल्या भांडणातून विनयभंग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्यातून त्यांच्यासह मुलगा, मुलगी आणि पत्नी यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात सादर केल्यावर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान २१ तारखेला त्यांना जामीन मिळाल्याने ते घरी परतले. मात्र, घरासमोर गर्दी होती. घराच्या मुख्य दाराचे कुलुप तुटल्याचे दिसले. (Latest Marathi News)

याची माहिती पोलिसांना शेजाऱ्यांनी दिल्याने अगोदरच पोलिस आलेले होते. अरुण यांनी आत जाऊन बघितले असता, त्यांच्या घरात तिजोरीचे कुलुप तोडून त्यातील सात लाख ७८ हजारांची रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख ७४ हजार ७९२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अविनाश निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक अश्‍विनी कोळी यांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT