nagpur news  sakal
नागपूर

Nagpur Crime : दारूच्या नशेत आधारकाठीने केला जन्मदात्या पित्याचा खून

शक्तीमातानगरात घडली थरारक घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने वडिलांवर लोखंडी आधारकाठीने वार करीत त्यांचा खून केला. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता.९) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नंदनवन पोलिस हद्दीतील शक्तीमातानगरात घडली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

कृष्णराव सदाशिव रायपूरकर (वय ७५) असे मृत वडिलांचे नाव असून अमित कृष्णराव रायपूरकर (वय ३७) असे आरोपी मुलाचे नाव आहे. कृष्णराव हे भूमीअभिलेख कार्यालयातून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. काही दिवसांत त्यांच्या पत्नीचे निधन झाले. अमित एका कचऱ्याच्या गाडीवर वाहनचालक म्हणून काम करतो.

मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्याने कामावर अनुपस्थित असतो. यातून वडिल व पत्नीशीही तो सातत्याने भांडण करायचा. यामुळेच त्याच्या पत्नीनेही त्याच्याशी चार महिन्यांपासून बोलणे बंद केले होते. त्यानंतरही अमित दररोज दारूच्या नशेत घरी यायचा.

शनिवारी सांयकाळी तो घरी दारू पिऊन आला आणि त्याने अर्चना यांना शिवीगाळ केली. कृष्णराव यांनी त्याला हटकले. अमितने कृष्णराव यांची आधारकाठी हिसकावली. त्यांच्यावर दोन वार केले. कृष्णराव खाली कोसळले. अर्चना यांनी आरडाओरड केली.

शेजाऱ्यांच्या मदतीने कृष्णराव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून कृष्णराव यांना मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT