Crime esakal
नागपूर

Nagpur Crime: पती, सासू, सासरे यांनी मारहाण करून विवाहितेची केली हत्या; गळफासाने मृत्यू झाल्याचा केला बनाव

पती, सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

तेल्हारा: तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम दहिगाव येथे ता. २१ जून रोजी जया गोपाल पातोंड (२६ वर्षे) नामक विवाहितेची पहाटे हत्या करण्यात आली.

अशा तक्रारीवरून तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये रात्री १०.४० वाजेच्या सुमारास आरोपी पती गोपाल समाधान पातोंड (३१), समाधान किसन पातोंड (६०, सासरा), देवकाबाई समाधान पातोंड (५५, सासू) सर्व राहणार दहिगाव यांचे विरुद्ध भादविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादी मारोती गोविंद अघडते (५५) रा. पारडी ता. बार्शीटाकळी यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये नोंदविलेल्या जबानी रिपोर्टनुसार, ता.२० जून रोजी मृतक जया पातोंड हिस तिचा पती, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे फिर्यादिला कळले.

ता. २१ जून रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादीला आरोपी गोपाल पातोंडने फोन करून सांगितले की ‘मामा तुम्ही उठले का, अन् जया गेली, ती उठून नाही राहिली’, असे सांगितले.

फिर्यादीने मृतकाच्या घरी जावून पाहिले असता मृतक जया ही पलंगावर टाकलेली होती. तिचे शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या. याप्रकरणी फिर्यादीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, महिला आरोपी वगळता दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची दोरी जप्त केल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर, सपोनि ज्ञानोबा फड, तपास अधिकारी पीएसआय गणेश कायंदे यांनी घटनेच्या दिवशीच ता. २१ जून रोजीच घटनास्थळी धाव घेतली.

मृतक विवाहिता जया पातोंड हिचे शवविच्छेदन अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले. दहिगाव (ता. तेल्हारा) येथे शोकाकुल वातावरणात तसेच चोख पोलिस बंदोबस्तात ता. २१ जून रोजी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतक जया पातोंड हिच्या पतीने तेल्हारा पोलिस स्टेशनला घटनेच्या दिवशी ता. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता माहिती दिली होती की, जयाचा गळफासाने मृत्यू झाल्याचे व त्यावेळी वडीलांसोबत शेतात असल्याचे सांगितले होते.

त्याआधारे पोलिसांनी सीआरपिंसीच्या १७४ कलमान्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आता मृतकाचे वडील मारोती गोविंद अघडते यांनी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास जबाब नोंदविल्याने नमूद आरोपिंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT