Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : अपहरण करून फेकले विहिरीत;जुन्या भांडणातून काढला युवकाचा काटा

जुन्या भांडणातून युवकाचे अपहरण करीत, त्याला विहिरीत फेकून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी मोहम्मद शाहीद ऊर्फ एमपीडी वल्द मोहम्मद असलम (वय ३०, रा. डोबीनगर) याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जुन्या भांडणातून युवकाचे अपहरण करीत, त्याला विहिरीत फेकून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी मोहम्मद शाहीद ऊर्फ एमपीडी वल्द मोहम्मद असलम (वय ३०, रा. डोबीनगर) याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला ताब्यात घेतले.

लतीफ ऊर्फ हैदराबादी ताजुद्दीन शेख (वय २०, रा. मोहम्मदिया मदरसाजवळ, डोबी, मोमीनपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अब्दुल वसीम ऊर्फ वस्सी वल्द अब्दुल अजीज(वय २५), रेहान उर्फ मोंटू उर्फ मुक्‍का वल्द रियाज शेख (वय २५), जुनैद मोहम्मद असलम (वय २५, सर्व राहणार डोबी, मोमीनपुरा), इरफान उर्फ गझनी वल्द रेहमान खान (वय ३५, रा. मोतीबाग, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील मोहम्मद शाहीद ऊर्फ एनपीडी, इरफान ऊर्फ गजनी या दोघांवर मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल असून, अब्दुल वसीम ऊर्फ वस्सी याच्यावर बरेच गुन्हे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिलला मोहम्मद फरहान ऊर्फ अन्ना वल्द मोहम्मद नियाज नाजा (वय १९, रा. महात्मा फुले बाजार, बोरियापुरा, मोमीनपुरा) याचा मृतदेह नोगा फॅक्टरीतील विहिरीत आढळला.

तपासात पाचपावली ठाण्याचे निरीक्षक बाबुराव राऊत आणि तहसील ठाण्याचे निरीक्षक संदीप बुआ यांच्या पथकाने संयुक्त तपास केला. तपासात फरहानचा भाऊ अजमान याचे बोरियापुरात मोहम्मद शाहीद ऊर्फ एमपीडी याच्याशी भांडण झाल्याची माहिती समोर आली. अजमान याने एक वर्षांपूर्वी त्याचा मित्र अय्या आणि फरहानह मोहम्मद शाहीद आणि त्याच्या मित्रांना मारहाण करीत जखमी केले होते. त्याचा राग मोहम्मद शाहीदच्या मनात होता.

त्याने २१ एप्रिलला रात्रीच्या सुमारास फरहानचे अपहरण करीत, बोरियापुऱ्यातील नोगा कंपनीजवळ नेले. तिथे त्याला मारहाण करीत विहिरीत फेकले. सध्या मोहम्मद शाहीद कारागृहात असून इतर चार जण फरार असून त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT