Crime Sakal
नागपूर

Nagpur Crime : आईचे रागावणे असह्य झाल्याने मुलाने घेतला गळफास

आईशी झालेल्या घरघुती वादातून २४ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आईशी झालेल्या घरघुती वादातून २४ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.१३) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रोहित प्रकाश बारंगे (वय २४) असे युवकाचे नाव असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. तो चिडचिडा स्वभावाचा असल्याने त्याचे नेहमीच कुणाशीही भांडण व्हायचे. त्यामुळे आई त्याला सातत्याने रागवायची. त्यातूनच त्याने आठ महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने वेळीच उपचार झाल्याने तो वाचला होता.

रविवारी सकाळीही तो चिडचिड करीत असल्याने आईने त्याला रागावले. त्यामुळे तो आईशी भांडू लागला. त्यानंतर आई घराबाहेर निघून गेली. रोहित रागाचा भरात किचनमध्ये गेला. त्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घरी परत आल्यावर त्याच्या आईला हा प्रकार दिसला. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला खाली उतरविले.

यावेळी आई कुसूम प्रकाश बारंगे (वय ४०) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्‍वर येथील उपनिरीक्षक वाकडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT