nagpur crime news  sakal
नागपूर

Nagpur Crime News : भाजी कापण्याच्या चाकूने सासूवर सपासप वार

प्रतापनगरात सुनेच्या कृत्याने उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या सुनेने भाजी कापण्याच्या चाकूने ८० वर्षीय सासूच्या गळ्यावर सपासप वार करीत खून केला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागोबा मंदिराजवळील गुडधे लेआऊट परिसरात उघडकीस आली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.

पुनम आनंद शिखरवार (वय ३८) असे आरोपी सुनेचे नाव असून तारादेवी ब्रिजलाल शिखरवार (वय ८०) असे मृत सासूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम आणि आनंद शिखरवार यांचे २००६ साली लग्न झाले. आनंद याने घरासमोरच एक रुम तयार करीत, तिथे दुचाकी दुरुस्तीचे दुकान सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून आनंदची पत्नी ही मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यावर उपचार सुरू असून ती नियमित गोळ्या खायची. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तिने गोळ्या खाणे बंद केले.

त्यामुळे ती सातत्याने उद्विग्न व्हायची. याशिवाय कुणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून हातात येणारी वस्तू भिरकवून देत असे. दरम्यान शनिवारी सांयकाळी त्या स्वयंपाक करीत असताना, अचानक हातात भाजी कापण्याचा चाकू घेऊन ती हॉलमध्ये आली.

तिथे बसलेल्या तारादेवी यांच्या अंगावर धावून जात, तिने त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे सासू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. दरम्यान काही वेळात घरातून आवाज येत नसल्याने समोर दुकानात असलेला आनंद घरात गेला. त्याने हा प्रकार बघताच आरडाओरड केली.

शेजारी गोळा झाले. यापैकी एकाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकलला पाठवला. पोलिसांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल करीत, अटक केली असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT