‘क्राईम पेट्रोल’बघून रचला ‘गॅंगरेप’चा बनाव sakal media
नागपूर

‘क्राईम पेट्रोल’ बघून रचला ‘गॅंगरेप’चा बनाव; प्रियकराशी करायचे होते लग्न

प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीने स्वःतावर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचला.

अनिल कांबळे

नागपूर : टीव्हीवर सुरू असलेल्या ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील एक भाग बघून प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीने स्वःतावर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचला. प्रियकर आपल्याशी सहानुभूती दाखवून लग्न करेल, या उद्देशाने हे गॅंगरेप नाट्य घडविण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरूणी कळमेश्‍वर तालुक्यातील एका खेड्यात राहते. तिच्या प्रियकराचे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलवर त्या मुलीचे वडिल काम करतात. ‘मुलीला संगीताची आवड असून तिला संगीत शिकायचे आहे.’ असे तिच्या वडिलाने हॉटेलमालक असलेल्या युवकाला सांगितले. त्या मुलीला हॉटेलवर बोलावून घेतले आणि पुढील शिक्षणासाठी मदतीचे आश्‍वासन दिले. तिची ॲडमिशन करून दिली आणि मदतसुद्धा केली. त्यामुळे ती तरूणी युवकावर फिदा झाली.

तेव्हापासून दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. दोघांचे फोन आणि चॅटिंग सुरू झाली. आपल्याशी मोबाइलवर बोलत असल्यामुळे तिचे त्याच्यावर प्रेम जडले. मात्र, तिच्याशी फक्त मैत्री असल्याचे तो कबुल करतो. तरूणीला त्या युवकाशी लग्न करायचे होते. परंतु सामाजिक अंतर आणि कुटुंबियाचा विरोध होणार हे गृहितच होते. त्यामुळे काहीतरी वेगळे केल्याशिवाय आपले लग्न होणार नाही, अशी खात्री तिला पटली.

त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून त्या युवकाला लग्नासाठी तयार करीत होती. परंतु, तो लग्नास नकार देत फक्त मैत्री ठेवण्यावर कायम होता. यादरम्यान तिने टीव्हीवर क्राईम पेट्रोल बघितले. त्यामुध्ये एक तरूणी स्वतःवर बलात्कार झाल्याचे नाट्य रचते आणि शेवटी तिच्या प्रियकराला सहानुभूती म्हणून दया येऊन लग्नास होकार देतो. याच मालिकेतून तिला प्रोत्साहन मिळाले आणि तिने स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचण्याचे ठरविले.

पोलिसांची तारांबळ

तरूणीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तिची तक्रार लिहून गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला. मात्र, तपासात ती फक्त मोबाइलवर बोलत फिरत असून स्वतःहून ऑटोने कळमन्यात पोहचत असल्याचे दिसते होते. त्यामुळे पांढऱ्या रंगाची ओमनी कार आणि दोघांनी अपहरण करून बलात्कार केल्याचा बनाव उघडकीस आला. तिची वैद्यकिय चाचणी केल्यानंतरही बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ती वारंवार बलात्कार झाल्याच्या घटनेवर ठाम होती. शेवटी तिला सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यानंतर तिने खरा प्रकार सांगितला. युवतीच्या खोट्या तक्रारीमुळे जवळपास सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास १००० पोलिस कर्मचाऱ्यांना दिवसभर धावपळ करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT