suicide sakal
नागपूर

Nagpur Crime : शोरूम मॅनेजरच्या आत्महत्येसाठी दोघांवार गुन्हे

पैशाच्या वसुलीसाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime - येथील दारव्हा रोडवर असलेल्या दुचाकी शोरूममधील व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.सात) सकाळी किन्ही शिवारात उघडकीस आली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शोरूम मालकासह अन्य दोघांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सुरेश गुलाबराव गावंडे (वय ४८, रा. दत्तात्रयनगर, यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या दुचाकी शोरूम व्यवस्थापकाचे नाव आहे. दिलीप बोबडे (शोरूम मालक), भूषण बोबडे, सचिन बोबडे (रा. यवतमाळ) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. तो मागील अनेक वर्षांपासून यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर असलेल्या दुचाकी शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

शोरूममध्ये अफरातफर करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यामुळे तो कामावर जात नव्हता, असे सांगितले जाते. अफरातफरीच्या पैशाच्या वसुलीसाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तिघांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून किन्ही शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

त्यात तिघांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद होते. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेश गावंडे याने काही जवळच्या नातेवाइकांना फोनदेखील केले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

याप्रकरणी मृताची पत्नी ज्योत्सना सुरेश गावंडे हिने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दुचाकी शोरूम मालक आणि उद्योजक दिलीप बोबडे, भूषण बोबडे व सचिन बोबडे यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT