Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: जुगारीत गमावले २५ लाख, कर्जबाजारीपणामुळे प्रॉपर्टी डिलर बनला 'चोर', घरात घुसून चोरली महिलेची सोनसाखळी

जुगाराच्या सवयीतून २० ते २५ लाखांचे कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी प्रॉपर्टी डीलरने अजनीतील दाम्पत्याला लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. गुन्हेशाखेच्या युनिट चारने त्याला अटक करून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ डिजिटल टीम

जुगाराच्या सवयीतून २० ते २५ लाखांचे कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी प्रॉपर्टी डीलरने अजनीतील दाम्पत्याला लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. गुन्हेशाखेच्या युनिट चारने त्याला अटक करून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी त्याने बालाजीनगरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात शिरून पतीला जखमी करीत, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली होती.

देवेंद्र नारायण सोनसावरे (वय ३६, रा. सीआरपीएफ कॅम्प, हिंगणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २७) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रमेश नेहते (वय ८०) आणि त्यांची पत्नी इंदुमती नेहते (वय ७६) घरी असताना, आरोपी त्यांच्या घरात शिरला. त्याने इंदुमती यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रमेश यांनी त्याचा विरोध केला असता, त्यांच्यावर हातोडीने वार करून त्यांना जखमी केले. आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार झाला.

अजनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना देवेंद्र सीआरपीएफ कॅम्प येथील लता मंगेशकर रुग्णालयाजवळ फिरताना आढळून आला. (Latest Marathi News)

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासात हाच तो संशयित असल्याचे युनिटचे पोलिस निरीक्षक ताले, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, कॉन्स्टेबल सुनील ठवकर, रोशन तिवारी, अतुल चाटे, पोलिस शिपाई देवेंद्र नवघरे, स्वप्नील अमृतकर, संदीप मावलकर, सत्येंद्र यादव यांना लक्षात येताच, त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने घरात शिरून लुटण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT