Nagpur Crime  sakal
नागपूर

Nagpur Crime : चोरट्या मार्गाने प्रतिबंधित मद्याची तस्करी;दोन आरोपींसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरट्या मार्गाने प्रतिबंधित मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक त्यांच्याकडून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर एक आरोपी फरार झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चोरट्या मार्गाने प्रतिबंधित मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक त्यांच्याकडून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर एक आरोपी फरार झाला. ऑटोमेटिव्ह चौक ते कळमना रोडवरील ताज गॅस वेल्डिंग जवळ, विनोबा भावेनगर मार्गावरून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध मद्यसाठा येत असल्याची माहिती गुप्त माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून दहा चाकी वाहनाची तपासणी करण्यात आली.

प्रथम दर्शनी वाहनामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील कोळशाची राख भरलेली दिसून आली. कसून तपासणी केली असता वाहनाच्या केबिनमधून दरवाजा तयार करून एक ५ फूट उंचीचा छुपा कप्पा तयार करण्यात आला होता.

यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले व मध्य प्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीकरिता असलेला मद्य आढळून आले. या प्रकरणी वाहन चालक सतीश दिलीप सोनवणे व सहाय्यक योगेश जानरावजी धुर्वे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक दोन मोबाईल व ४० लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडी मालक विशाल जांबुळकर फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT