nagpur sakal
नागपूर

Nagpur Crime : पत्नी नांदायला येत नाही; जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

पत्नीही जखमी, रागातून घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पत्नी नांदायला घरी येत नसल्याने संतापलेल्या जावयाने सासूवर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. पत्नीलाही त्याने जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.४) दुपारी पारडी परिसरात घडली. जखमी सासूवर मेयोत उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जानकी शाहू (वय ४५, रा. शितला माता मंदिराजवळ, पारडी) असे जखमी सासूचे तर दुलेश्वरी (वय २८) असे पत्नीचे नाव आहे. राजेंद्र शाहू (वय २८, रा. डिप्टी सिग्नल, कळमना) असे अटकेतील आरोपी जावयाचे नाव आहे. राजेंद्रला दारूचे व्यसन आहे. तो काही दिवसांपूर्वी ड्रायव्हर म्हणून कामाला होता. अलीकडे टाइल्स फिटिंगच्या कामाला जायचा. काम नसल्यास दारूच्या नशेतच असायचा.

अशातच एप्रिल महिन्यात जानकी यांची मुलगी दुलेश्वरीचे लग्न राजेंद्रसोबत झाले होते. मात्र, लग्नानंतरच राजेंद्रच्या व्यसनाबाबत समजले. यावरून त्यांच्यात खटके उडत. सततच्या त्रासाला कंटाळून दुलेश्वरी माहेरी निघून गेली आणि आई- वडिलांसोबतच राहत होती. तिकडे दुलेश्वरी घरी यावी, यासाठी राजेंद्र प्रयत्न करीत होता. त्यातून त्याने सासूला अनेकदा विनवण्याही केल्या. पण, काहीच उपयोग होत नसल्याने तो संतापला.

बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तो दारूच्या नशेतच सासूच्या घरी पोहोचला. सासरे दुबकुमार कामावर गेले होते. बाहेरूनच त्याने पत्नीला आवाज दिला आणि तिला घरी परत चलण्यास सांगितले. मात्र, दुलेश्वरीने स्पष्टच नकार दिला. संतापाच्या भरात त्याने चाकू काढून पत्नीवर वार केला.

तिने कसाबसा वार चुकविला, मात्र तिच्या पाठीला दुखापत झाली. जानकी मुलीच्या मदतीसाठी धावल्या असता, राजेंद्रने सासूच्या छाती, हातावर वार करून गंभीर जखमी केले. शेजाऱ्यांनी धावपळ करीत दोघींनाही जवळच्या रुग्णालयात नेले. तिथून मेयोत पाठविण्यात आले. जानकी यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT