death body sakal
नागपूर

नागपूर : माणुसकी संपली; मेयोत बारा तास मृतदेह पडून

१२ तासांपेक्षा अधिक वेळ मृतदेह येथील क्षयरोग विभागासमोर पडून होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) न्यायवैद्यक विभागात काही वर्षांपूर्वी मृतदेहाचे कान कुरतडल्याचे प्रकार पुढे आले होता. ही एकप्रकारची मृतदेहाची विटंबनाच होती. तसाच प्रकार पुन्हा घडला असून १२ तासांपेक्षा अधिक वेळ मृतदेह येथील क्षयरोग विभागासमोर पडून होता. मात्र ये-जा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचारी यांनी पोलिसांना कळविले नाही. यावरून मेयोतील कर्मचाऱ्यांमध्ये ‘माणुसकी’ शिल्लकच राहिली नसल्याचा प्रत्यय आला.

मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या बाजूला रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास एक व्यक्ती पडून होता. मात्र या प्रकरणाची माहिती मेयोतील पोलिस चौकीला कोणी कळविली नाही. मेयोत तसे विखुरलेले वॉर्ड आहेत. क्षयरोग वॉर्ड परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांचा वावर कमी असतो. मात्र येथील वॉर्डात क्षयरुग्ण भरती असतात. याशिवाय येथे मेयोचे स्टोअर कार्यालय आहे. तरीदेखील या भागात बेवारस मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले नाही.

तब्बल १२ तासांपेक्षाही अधिक काळ येथे मृतदेह पडून होता. अशाप्रकारे मेयोच्या परिसारत बेवारस मृतदेह पडून असण्याचे प्रकार नवे नाहीत. ही एकप्रकारची मृतदेहाची विटंबना असल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. संशयास्पद अवस्थेत मृतदेह बघूनही या परिसरातून ये-जा करणारे मेयोचे कर्मचारी तोंडावर बोट ठेवून असतात. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पोलिस आले.

पुढे हा मृतदेह शवविच्छेदन विभागात हलवला. बारा तास मृतदेह पडून असल्याने दुर्गंधी येत असल्याची खंत एका व्यक्तीने बोलून दाखवली. वास्तविक पाहता असे मृतदेह आढळल्यानंतर त्याची माहिती आधी पोलिस चौकीत कळविणे बंधनकारक असते. माहिती कळविल्यानंतर पोलिस कायदेशीर कार्यवाही पूर्ण करतात. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनगृहाकडे हलविणे अभिप्रेत असते; परंतु कोणालाही या मृत्यूची माहिती पोलिसांना कळविता आली नाही.

असे प्रकार नित्याचेच

मेयो रुग्णालय परिसरात बेवारस मृतदेह पडून असणे नित्याचेच झाले असल्याची प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटिवर दिला. दर दोन तीन दिवसानंतर या परिसरात बेवारस मृत्यूची नोंद होते. महिनाभरात दहा ते बारा बेवारस मृतदेहांवर शवविच्छेदन केले जात असावे असेही ते म्हणाले. अशाप्रकारे मृतदेह पडून असणे म्हणजे मृतदेहाची अवहेलनाच आहे. यापूर्वीही अनेकदा अशी अवहेलना झालेली आहे. उन्हात तास न तास मृतदेह पडलेले असतात, यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT