विकास शुल्कात तिप्पट वाढ sakal
नागपूर

नागपूर : विकास शुल्कात तिप्पट वाढ

आता ५६ ऐवजी मोजावे लागणार १६८ रुपये

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महागाईच्या आगीत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी दरवाढीचे चटके मिळत आहेत. आता घर बांधण्यासाठी भूखंड घेणे अधिकच महाग होणार आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने विकास शुल्कात तिप्पट वाढ केली. परिणामी नागरिकांना ५६ ऐवजी १६८ रूपये शुल्क मोजावे लागणार आहे.

शहरातील अनियमित भूखंड नियमितीकरणासाठी गुंठेवारी कायदा लागू करण्यात आला आहे. याकरिता ५६ रुपये प्रति चौरस फूट शुल्क नियमितीकरणासाठी घेण्यात येत होते. नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने शहरात अनधिकृत भूखंडाचे नियमितीकरण केले जात आहे. स्वस्त भूखंड घेऊन घरकूल उभारल्यानंतर विकास शुल्क आकारल्या जात असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. विकास शुल्क भरल्यानंतरही सर्व सुविधा मिळेलच याची खात्री नाही.

फक्त कागदोपत्री आर.एल. एक शिक्का मारला जातो. हा शिक्का असल्याशिवाय बँकेचे कर्जही मिळत नाही. त्यामुळे माफक शुल्क नियमितीकरणासाठी आकारण्यात यावे अशी मागणी जनतेची होती. सध्या गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणाची मुदत २००१वरून २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे. पाच ते सात लाखांच्या हजार चौरस फुटाच्या भूखंडासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये वाढीव शुल्कामुळे नागरिकांना भरावे लागणार आहे.

ही तर लूट : कृष्णा खोपडे

भूखंडधारकांच्या सोयीसाठी गुंठेवारीची मुदत वाढवल्याचे महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र, विकास शुल्कात तीनपट वाढ करून आघाडी सरकार जनतेची लूटमार करीत असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. इंधन तसेच इतर महागाईवर गळे काढताना महाविकास आघाडीचे नेते व वाढीव गुंठेवारी शुल्कावर का बोलत नाही, असाही सवाल खोपडे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT