Congress Congress
नागपूर

नागपूर : स्थायी समितीसाठी कॉंग्रेसमध्ये मतभेद

काहींकडून दावा; बैठकीत खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेतील (nagpur jilha parishad) स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी कॉंग्रेसमधील (congress) काही जण उत्सुक असून त्यांनी दावाही केला. नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्यांच्या निवडीवरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. ओबीसी आरक्षण रद्द (obc araskahan)झाल्याने जिल्हा परिषदेतील १६ सदस्‍यांचे सदस्यत्व रद्द झाले. यात उपाध्यक्ष, स्थायी समितीमधील तीन सदस्य व इतर समित्यांमधील सदस्यांचा समावेश होता. या १६ जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नुकसान झाले. भाजपचे(bjp) एक तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे() दोन सदस्य कमी झाले. स्थायी समितीमध्ये कमी झालेल्या तीन जागांमध्ये दोन कॉंग्रेस तर एक भाजप होती.

या जागा भरण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेसकडून सत्तापक्ष नेते अवंतिका लेकुरवाळे व कुंदा राऊत यांचे नाव जवळपास अंतिम करण्यात आले होते. परंतु नवनियुक्त सदस्य अरुण हटवार यांनीही स्थायी समिती मिळण्यासाठी दावा केला. परंतु याला काहींकडून विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे खडाजंगीही उडाल्याची चर्चा आहे. हटवार हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या गटातील असल्याचे सांगण्यात येते.

तर लेकुरवाळे व राऊत या मंत्री सुनील केदार गटातील असल्याचे सांगण्यात येते. लेकुरवाळे या पूर्वीच स्थायी समितीमध्ये होते. पोट निवडणुकीत कुंदा यांना ज्योती राऊत यांच्या जागी तिकीट मिळाली. ज्योती राऊत या स्थायी समितीमध्ये होत्या. त्यामुळे या दोन्ही सदस्यांना स्थायी समितीत पाठविण्यावर चर्चा झाली. परंतु हटवार यांना दावा केल्याने नावांवर अंतिम निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT