gram panchayat election sakal
नागपूर

Nagpur : दिवाळीनंतर ग्रा. पं. निवडणुकीचे फटाके!

३६५ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; शासकीय स्तरावर वाढल्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने दिवाळीनंतरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा तालुकानिहाय तपशील नुकताच मागितला. त्यामुळे उच्चपातळीवरून निवडणुकांसदर्भात वेगवान हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या ही काटोल, हिंगणा आणि भिवापूर तालुक्यात अधिक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण दिवाळीपूर्वीपासून खऱ्या अर्थाने तापायला सुरू होईल. ग्रामपंचायतींची मुदत संपण्याच्या महिनाभरापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कधीही या निवडणुकांची आचारसंहिता लागेल. ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपत नाही तोच लोकसभा निवडणुका समोर आहे.

आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असेल. सर्वोच्च न्यायालयात १४ मार्चला ओबोसी आरक्षणावर अंतिम सुनावणी आहे. त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात महानगरपालिका व जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

नव्याने काही नगरपंचायती स्थापन झाल्याने त्यांचाही निवडणूक कार्यक्रम सोबतच लागेल असे बोलले जाते.

बहुतांश, मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच टप्प्यात होणार असल्याने राजकीय पक्षश्रेष्ठींसमोर चांगल्या उमेदवारांच्या शोधात चांगलाच कस लागणार आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेता विविध राजकीय पक्षांना अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

साऊथ सुपरस्टारच्या पत्नीने दाखल केली घटस्फोटाची याचिका ! अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे केले आरोप

Delhi Liquor Scam : ‘सीबीआय’ने घेतली उच्च न्यायालयात धाव; कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

SCROLL FOR NEXT