Nagpur division rank second in the state results have dropped by three per cent performance of Nagpur division improved
Nagpur division rank second in the state results have dropped by three per cent performance of Nagpur division improved sakal
नागपूर

निकाल घटला तरी कामगिरी सुधारली; नागपूर विभागाचा राज्यात दुसऱ्या क्रमांक

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाची कामगिरी बरीच सुधारली. गेल्यावर्षी अंतर्गत मूल्यांकनात ९९.६२ टक्के निकाल असताना नागपूर सहाव्या स्थानावर होते. मात्र, यंदा निकालात तीन टक्क्याची घट झाली असली तरी, नागपूर विभागाने राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकाविला. त्यामुळे निकाल घटला असला तरी यंदा विभागाची कामगिरी सुधारली असल्याचे दिसून आले.

कोरोनामुळे गेल्यावर्षी बारावीपरीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकनासाठी ३०-३०-४० या सूत्र अवलंबिण्यात आले. यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावी वर्गाच्या अंतर्गंत मूल्यमापनावर आधारित ४० टक्के गुणदान करण्यात आले. त्यामुळे निकालात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

मात्र, यंदा शिक्षण मंडळाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यातून विद्यार्थ्यांना होम सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. मात्र, अभ्यासक्रमात कपात करीत विद्यार्थ्यांना अधिकचा कालावधी देण्यात आला. असे असताना, होम सेंटर असल्याने निकालात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, याउलट निकालात ३ टक्क्यांची घट दिसून आली. मात्र, इतर विभागाच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाने दूसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

विभागात पुन्हा गोंदिया प्रथम

गेल्यावर्षी कोरोनामध्ये गोंदिया जिल्हा निकालात दुसऱ्या स्थानावर फेकल्या गेला होता. त्यापूर्वी सातत्याने गोंदिया जिल्हा आघाडीवर होता. यावर्षी ९७.३७ टक्क्यासह गोंदिया जिल्हा प्रथम स्थावावर आहे. मात्र, गेल्यावर्षी ९९.८२ टक्‍क्यासह प्रथम आलेला चंद्रपूर जिल्हा ९६.१० टक्क्यासह चौथ्या स्थानावर आहे. मात्र, नागपूर जिल्ह्याने आपले तिसरे स्थान अबाधित ठेवले आहे.

जिल्हानिहाय टक्केवारी

गोंदिया - ९७. ३७

भंडारा - ९७.३०

नागपूर - ९६. ६५-

चंद्रपूर -९६.१०

गडचिरोली - ९६.००

वर्धा - ९५.३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT