Nagpur sakal
नागपूर

नागपूर : त्वचारोग विभागात डॉक्टर रुग्णांच्या प्रतीक्षेत

एकच खिडकी, ५०० रुग्णांचे कार्ड काढायचे कसे?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वेळ सकाळी ११ वाजताची. रांगेतील रुग्णांनी एकच गलका केला. कार्ड द्या...कार्ड द्या...यानंतर काही रुग्णांनी थेट जिल्हाधिकारी यांचे नाव घेत विनवणी केली. जिल्हाधिकारी महोदय, जरा रुग्णांचे ऐका. आम्ही गरीब. खासगीचा खर्च पेलवत नाही. यामुळे आम्ही मेडिकलमध्ये उपचारासाठी येतो. परंतु, येथे आल्यानंतर मेडिकलच्या त्वचारोग विभागात दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही कार्ड निघत नाही. यामुळे डॉक्टरांच्या केबिन रिकाम्या असतात. कार्ड काढल्याशिवाय आम्ही डॉक्टरजवळ आम्ही कसे जाऊ? रांगेत राहून आमचा जीव टांगली लागला आहे. मेडिकलचे प्रशासन आमचे ऐकत नाही...या भावना आहेत मेडिकलच्या त्वचारोग विभागात उपचाराला आलेल्या रुग्णांच्या. कार्ड काढण्यासाठी एक खिडकी असून पाचशे रुग्णांची रांग येथे होती.

मेडिकलसह राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील ऑनलाइन सर्व्हर दोन महिन्यांपूर्वी डाऊन झाले. यामुळे सर्व कामकाज परंपरागत पद्धतीने ऑफलाइन सुरू आहे. याचा फटका रुग्णांना बसतो. मेडिकलमध्ये दररोज अडीच हजार रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यापैकी ५०० रुग्ण एकट्या त्वचारोग विभागात येतात. त्वचारोग विभागात एकच खिडकी असल्याने गर्दी कमी होत नाही. कार्ड न निघाल्याने डॉक्टर रुग्णांच्या प्रतीक्षेत असतात. कार्ड काढताना होणारा त्रास असह्य झाल्याने बुधवारी रुग्णांनी विभागप्रमुख डॉ. जयेश मुखी यांच्या खोलीवर धडक दिली.

ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे? .

ऑनलाइन सिस्टिम बंद आहे. दोन तासांपासून कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे आहो. परंतु, कार्ड निघाले नाही. खाली पडून जीव गेला तर जबाबदार कोण? हा सवाल आहे ७२ वर्षीय प्रकाश मालापूरे यांचा. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी असावी पण येथे महिला, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक असो की, व्हीआयपी यांच्यासाठी एकच रांग आहे. यामुळे कार्ड काढण्यासाठी विलंब होतो. बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपली की, डॉक्टर निघून जातात. शेवटी ज्या रुग्णांना कार्ड मिळते, ते बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरकडे तपासणी गेले की, खुर्ची रिकामी दिसते. अनेक रुग्णांची ना तपासणी होत, ना औषधोपचार मिळत, शेवटी घरी निघून जातात.

रुग्णांची एकच मागणी, लवकर कार्ड द्या...

गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र, त्यांची विविध मार्गाने हेळसांड होत आहे. कधी वेळेवर रक्त मिळत नाही तर कधी रक्ताची जमवाजमव रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावी लागते. कधी व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही तर कधी एक्स रे मशिन बंद असते. दहा वर्षांपासून सुरू असलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एचएमआयएस) ऑनलाइन सेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. पण पर्यायी व्यवस्था केली नाही. कार्ड काढण्याचे काम हातांनीच करावे लागत आहे. अडीच ते तीन हजार रुग्णांचे कार्ड हाताने लिहिण्यासाठी दहा ते बाराच कर्मचारी आहेत. विशेष असे की, त्वचारोग (स्कीन) विभागात ५०० रुग्णांची नोंद करण्यासाठी एक महिला कर्मचारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT