Crime News Sakal
नागपूर

Nagpur : डॉक्टरला साडेचार कोटींचा गंडा

अजित पारसेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

राजेश नागरे

नागपूर : सोशल मीडियाचा प्रभावीपणे वारून करून युवकांना कमाईचा मंत्र देणारा प्रसिद्ध सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे याने एका प्रतिष्ठित डॉक्टरला तब्बल साडेचार कोटी रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या झाडाझडतीत त्याच्या घरात अनेक बड्या राजकीय नेत्यांचे लेटरपॅड, विविध कार्यालयांचे शिक्के आणि बनावट कागदपत्रे आढळलीत. विशेष म्हणजे यात सदर पोलिस ठाण्याचा शिक्क्याचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अजित गुणवंत पारसे (वय ४२ रा. स्वावलंबीनगर) असे आरोपीचे पूर्ण नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या प्रभावाचा वापर करून एका प्रसिद्ध डॉक्टरला हेरले. पंतप्रधान कार्यालयातून ‘सोशल कार्पोरेट रिस्‍पान्सिबिलीटी’ (सीएसआर) अंतर्गत निधी मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून दीड कोटी रुपये घेतले. दरम्यान काही महिन्यांनी डॉक्टर त्यांच्या मित्राने घेतलेल्या कर्जात हमीदार होते.

ही माहिती अजित पारसे यांना मिळताच, त्याने डॉक्टरला केंद्रीय अन्वेषण ब्युरोचा (सीबीआय) वॉरन्ट पाठविला. नंतर स्वतःच ही केस मॅनेज करण्यासाठी पुन्हा दीड कोटी रुपये उकळले. पैसे घेतल्यावर काही दिवसात वॉरन्ट कॅन्सल करण्यात आल्याचेही बनावट पत्र पाठविले. एवढेच नव्हे तर पारसे डॉक्टरांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमात गेला होता. तेथे नातेवाईकाने एक मुलगा दत्तक घेतल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पारसेंनी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला बनावट नोटीस पाठवून आरोपी केले. हे प्रकरण निस्तारण्यासाठी पुन्हा दीड कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरने अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ते गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान पारसेने शहरातील आणखी एका डॉक्टरची अशीच फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे पारसेला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.

डॉक्टरांसह, अधिकाऱ्यांचा केला ‘हनीट्रॅप’

अजित पारसे हा गेल्या काही वर्षांत शहरात मोठे प्रस्थ झाला होता. त्यातून त्याने दिल्लीमध्ये आपली ओळख निर्माण केली. या माध्यमातून त्याने शहरातील नामांकित डॉक्टरांसह बड्या शासकीय अधिकाऱ्यांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकविल्याची माहिती आहे. या माध्यमातून त्याने जवळपास १८ ते २० कोटी रुपयेही उकळल्याचे समजते. विशेष म्हणजे शासकीय कामे करुन देण्याच्या बहाण्याने तो त्यांना दिल्लीत न्यायचा. त्यानंतर एका बड्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करुन त्यांच्या खोलीत तरुणींना पाठवून त्यांचे अश्‍लील छायाचित्र काढून ती सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैसे वसूल करायचा. अशा ८ ते १० जणांकडून त्याने पैसे उकळल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त

पारसे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर फायदा घेत होता. अनेक बडे नेते व लोकांवर त्याने छाप पाडली होती. घराच्या तपासणीमध्ये विविध राजकीय नेत्यांचे लेटरपॅड, विविध कार्यालयांचे शिक्के आणि बनावट कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT