nagpur drafts new fire service fee increase for construction building sakal
नागपूर

Nagpur : बांधकामासाठी अग्निशमन सेवा शुल्क वाढणार; राज्यात सरसकट एकच सेवा शुल्क

शासनाकडून अधिनियमात बदल;भविष्यात शहरात बांधकाम सेवा शुल्क वाढणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बांधकाम परवानगी देताना आकारण्यात येणारे विविध प्रकारचे अग्निशमन शुल्क आता राज्य सरकारनेन बंद केले आहे. त्यात सुसूत्रता आणत राज्यात सरसकट एकच ‘अग्निशमन व आपत्कालीन सेवा’ शुल्क लागू केले आहे. नवे सेवा शुल्क दोन टप्प्यात असून राज्य सरकारने बांधकामासाठी नव्या नियमानुसार शुल्क आकारणीची मनपाला परवानगी दिली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात बांधकाम सेवा शुल्क वाढणार आहे.

सध्या महापालिका अग्निशमन सेवा शुल्क चार टप्प्यांत आकारण्यात येत आहे. २० मीटर किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या इमारतीसाठी किमान २० हजार रुपये सेवाशुल्क घेण्यात येते. २४ मीटर उंच इमारत बांधकामासाठी महापालिका ३ रुपये प्रति वर्गमीटर दराने सेवा शुल्क आकारले जाते. २४ ते ३५ मीटर उंच इमारत बांधकामसाठी ५ रुपये तर ३५ ते ४५ मीटर उंच

इमारत बांधकामासाठी ७ रुपये तर ४५ मीटर उंच इमारत बांधकामासाठी १० रुपये प्रतिचौरस मीटर दराने सेवा शुल्क घेतले जाते. परंतु आता नव्या अग्निशमन व आपात्कालीन सेवा शुल्क अधिनियमात बदल करण्यात आला आहे. हे शुल्क रेडीरेकनरमध्ये दर्शविलेल्या बांधकाम खर्चाशी लिंक करण्यात आले आहेत.

त्यात दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार ४५ मीटर उंचीपर्यंतच्या निवासी बांधकामांसाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ०.२५ टक्के, तर ४५ मीटर उंचीच्या वरील बांधकामांसाठी एकूण खर्चाच्या ०.५० टक्के शुल्क आकारण्यास महापालिकांना परवानगी दिली आहे. सध्यास्थितीत महापालिका सेवा शुल्क वाढविणार नाही, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

सेवा शुल्क वाढविण्यासाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. महासभेने मंजूर केलेला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविणे, राज्य सरकारने तो मंजूर करणे ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतरच सेवा शुल्कात वाढ होईल, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे तुर्तास नागपूरकरांवर भुर्दंड नाही. परंतु राज्य सरकारने अधिनियमातच बदल केल्याने त्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे येत्या काळात सेवाशुल्कात बदल होईल. परंतु सरसकट वाढणार नाही. काही भागातील दर कमी पण होण्याची शक्यता अधिकाऱ्याने वर्तविली.

बांधकामासाठी अग्निशमन विभागाचे सध्याचे सेवा शुल्क

- १५ ते २४ मीटर उंच इमारतीसाठी - ३ रुपये प्रति वर्गमीटर (किमान २० हजार रुपये)

- २४ ते ३५ मीटर उंच इमारतीसाठी - ५ रुपये प्रति वर्गमीटर (किमान २५ हजार रुपये)

- ३५ ते ४५ मीटर उंच इमारतीसाठी - ७ रुपये प्रति वर्गमीटर (किमान ३५ हजार रुपये)

- ४५ मीटरपेक्षा जास्त उंच इमारतीसाठी - १० रुपये प्रति वर्गमीटर (५० हजार रुपये)

नव्याने लागू दर...

४५ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीसाठी (निवासी) - ०.२५ टक्के

४५ मीटर उंचीच्या वरील इमारतींसाठी (निवासी) - ०.५० टक्के

४५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतीसाठी (व्यावसायिक) -

०.७५ टक्के

४५ मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी (व्यावसायिक) - १ टक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT