Nagpur During the online meeting From the corporator cigarette  sakal
नागपूर

ऑनलाइन सभेदरम्यान नगरसेवकाकडून सिगारेटचे झुरके

विरोधी पक्षनेते बोलत असताना काँग्रेस सदस्याचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या ऑनलाइन सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे बोलत असतानाच त्यांच्याच पक्षाचे सदस्य रमेश पुणेकर सिगारेटचे झुरके मारताना आढळून आले. सायंकाळपर्यंत नगरसेवक पुणेकर यांच्या सिगारेटचे झुरके संपूर्ण शहरात पोहोचले. त्यामुळे महापालिकेच्या सभेत सहभागी होतानाही सदस्य गंभीर नसल्याची चर्चा रंगली आहे.

कचरा संकलन करणारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया कंपनीचे कंत्राट रद्द करणे, नव्या कंपनीची नियुक्ती करणे यावर आज महापालिकेची विशेष सभा ऑनलाइन पार पडली. या सभेत महापौरांसह आयुक्त राधाकृष्णन बी., सर्वच अतिरिक्त आयुक्त, विविध विभागप्रमुख, गटनेते व सदस्य घरूनच ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे या कंपन्यांकडून होणारा अटीचा भंग, नियमाची पायमल्ली आदीवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक रमेश पुणेकर सिगारेट ओढताना स्क्रीनवर दिसून आले. पुणेकर सिगारेट ओढताना काही नगरसेवकांनी बघितले.

परंतु कुणीही सभेदरम्यान त्यांच्यावर ताशेरे ओढले नाही किंवा त्यांचे ते स्क्रीनवर दिसत असल्याकडे लक्ष वेधले नाही. या स्क्रीनवर महापौर व इतर दोन नगरसेवक दिसत आहेत. नेमके याच वेळेला कुणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग सायंकाळपर्यंत अनेकांच्या मोबाईलवर दिसून आले.

महापालिकेची सभेसाठी उपस्थित राहताना धूम्रपान आदी न करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेलाही पुणेकर यांच्या कृत्याने तडे गेले आहे. विशेष सभेत गंभीर विषयावर चर्चा केली जाते. विशेष सभेच्या गांभीर्यालाही धक्का बसला असून पुणेकर यांच्या वर्तनाने नगरसेवकांच्या प्रतिमेलाही तडा गेल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT