Nagpur Election today for Speaker posts sakal
नागपूर

Nagpur : सभापती पदांसाठी आज निवडणूक

चारही पदे महाविकास आघाडीकडेच राहणार, लॉबिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांसाठी उद्या,मंगळवार १ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार सर्व पदे महाविकास आघाडीकडेच राहणार असल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुक असून त्यांनी लॉबिंगही सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती असे एकुण सहा पद आहेत. विधानसभा मतदार संघानिहाय पद देण्याचे निश्चित असल्याचे सूत्रांकडून समजते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सावनेर व हिंगणा तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्यामुळे चार सभापती पदे उर्वरित मतदारसंघाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येते. हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एका पदासाठी दावा करण्यात येत आहे. कामठी मतदारसंघातून अवंतिका लेकुरवाळे, दिनेश ढोले यांच्या नावाची चर्चा आहे.

अवंतिका लेकुरवाळे या सत्ता पक्षनेत्या आहेत. तर रामटेक मतदारसंघात दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्यात चुरस आहे. कुमरेंचे नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. त्यांना एका समितीवर घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. तीन पुरुष व तीन महिला सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी सदस्यांची आहे. अशा परिस्थितीत कुमरे यांची वर्णी लागल्यास लेकुरवाळेंचा पत्ता कटू शकतो. लेकुरवाळेंची वर्णी लागल्यास कुमरेंचा पत्ता कटण्याची शक्यता आहे. कुमरे यांना समाज कल्याण समिती दिल्यास चार महिला पदावर महिला सभापती होतील.

त्यामुळे आता फक्त महिला व बाल कल्याण समितीला महिला द्या, उर्वरित तीन ठिकाणी पुरुष सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उमरेडमधून अरूण हटवार व मिलिंद सुटे दावेदार असल्याची चर्चा आहे. हटवार यांनी यापूर्व उपाध्यक्ष पदासाठी दावा केला होता. याशिवाय संजय जगताप, सुनीता ठाकरे, योगेश देशमुख हेही पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. उद्या सोमवारला नेत्यांकडून सदस्यांची मते जाणून घेऊन मंगळवारला नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरांना मदत करून कॉंग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश मिळाले होते. परंतु, यावेळी सर्व बंडखोर सदस्यांना घरवापसी केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे. नाना कंभाले यांनीही फार्म हाऊसवर जाऊन सदस्यांशी भेट घेतली. परंतु, निवडणुकीच्या दिवशी भूमिका स्पष्ट करणार असल्याने कंभाले यांनी स्पष्ट केले. मंगळवारी सकाळी भाजपची बैठक होणार आहे. यात निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गट नेत्याची बैठकीकडे पाठ

राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोनची मागणी सोडत एका पदावर समाधान मानण्याची तयारी केली आहे. या एका पदासाठी बंग आणि देशमुख गटात रस्सीखेच सुरू आहे. बंग गटाकडून दिनेश बंग तर देशमुख गटाकडून बाळू जोध व सलील देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. तर शेकापचे सदस्य समीर उमप यांच्याही नावाची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गट नेते दिनेश बंग यांनी निवडणुकीबाबत सदस्यांची बैठक बोलावली होती. पण बैठकीला सर्वांनीच पाठ दाखविल्याची माहिती आहे. दिनेश बंग यांच्याशी संपर्क केला असता नंतर बोलतो, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT