Nagpur  Esakal
नागपूर

Electoral Bond: ‘गहाळ निवडणूक रोखे कुणाचे?’ भाजपाकडून करण्यात आली 'हफ्ता वसुली', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

निवडणूक रोखे कुणी खरेदी केले होते, याचा खुलासा होण्याची आवश्यकता असून ही भाजपची हफ्ता वसुली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

Electoral Bond SBI Non Disclosed Information: भारतीय स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला २५०० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची माहिती दिलेली नाही. हे निवडणूक रोखे कुणी खरेदी केले होते, याचा खुलासा होण्याची आवश्यकता असून ही भाजपची हफ्ता वसुली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी केला.

भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाने १४ मार्चला संकेतस्थळावर अपलोड केली. परंतु यावेळी जवळपास अडीच हजार कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची माहिती दिलेली नसल्याचे उघड झाले आहे.

निवडणूक रोख्याच्या प्रकारातून ‘चंदा दो, धंदा लो’, हफ्ता वसुली, लाच घेण्याचा हा नवा प्रकार व बनावट कंपन्यांमधून मनी लॉँड्रींग करण्यात आल्याचा आरोप खासदार जयराम रमेश यांनी आज केला. एसबीआयने मार्च २०१८ मध्ये रोख्यांची पहिली खेप विकली. यातील २५०० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची माहिती उघड झालेली नाही. हे रोखे कुठे आहेत, असा सवाल रमेश यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मेघा इंजीनिअरिंगचे महाराष्ट्र कनेक्शन

निवडणूक रोखेप्रकरणात हैदराबाद येथील मेघा इंजीनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड (एमईआयएल) या कंपनीने सर्वाधिक रोखे खरेदी करण्यांमध्ये समावेश आहे. याच कंपनीला ठाणे ते बोरिवली हा बोगदा तयार करण्याचे १४ हजार ४०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. एलअँडटी या कंपनीला डावलून या कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या कंपनीने हे रोखे एप्रिल २०२३ मध्ये खरेदी केले होते. दुसर्याच महिन्यात हे कंत्राट या कंपनीला मिळाल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT