Nagpur fake signature Fraud esakal
नागपूर

नागपूर : खोटी स्वाक्षरी करून फसवणूक

मित्राच्या खात्यातून १२ लाख वळविले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - लॅन्ड डेव्हलपर्स कंपनीमध्ये भागीदार असलेल्या मित्राची खोटी स्वाक्षरी करून त्याच्याच मित्राने पत्नीच्या खात्यावर १२ लाख २७ हजार वळविल्याची माहिती समोर आली. फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नवनीत ज्ञानेश्‍वर लांडगे (वय ४९, श्रीकृष्णनगर, झिंगाबाई टाकळी), देवयानी नवनीत लांडगे (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार रामचंद्र तिवारी (वय ६२, माता नगर, झिंगाबाई टाकळी) यांची श्रीराम लॅन्ड डेव्हलपर्स नावाने फर्म आहे. त्यात नवनीत यांची पत्नी देवयानी भागीदार आहे. या दोघांचेही श्रीराम को. ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गोधनी येथील शाखेमध्ये ज्वॉईंट अकाउंट आहे.

त्यात प्लॉटच्या खरेदी विक्रीतून आलेल्या नफ्याची रक्कम जमा होते. विशेष म्हणजे याच बॅंकेत नवनीत लांडगे कॅशिअर आहेत. त्यामुळे येथेच त्यांनी खाते सुरू केले. दरम्यान नवनीत आणि देवयानी यांनी संगनमत करीत शिवकुमार तिवारी यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या. त्यातून ३१ धनादेशाच्या माध्यमातून ९ लाख ४८ हजार काढले. याशिवाय त्यांच्या संमतीविना १६ व्हाऊचरच्या माध्यमातून २ लाख ७९ हजार ४२६ रुपये असे एकूण १२ लाख २७ हजार ४२६ रुपये पत्नीच्या स्वतंत्र खात्यात वळते केले.

दोघांवरही गुन्हा नोंदविला

खात्यात पैसे नसल्याची माहिती समोर आली असता, त्यांनी बॅंकेत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या स्वाक्षरीनेच धनादेश वटविण्यात आल्याची माहिती समोर आली. याबाबत त्यांनी नवनीतला विचारणा केली. मात्र, त्याने कुठलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी तक्रारीची चौकशी केल्यावर पोलिसांनी दोघांवरही गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT