Nagpur  Esakal
नागपूर

Organ Donation: शेतकरी कन्येच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान, दृष्टिहीन बांधवांच्या आयुष्यात पेरला उजेड

अशिक्षित शेतकरी कुटुंबांत जन्माला आलेल्या मुलीने मृत्यूला कवटाळताना केलेल्या अवयव दानातून तिघांचे आयुष्य उजळून निघाले. तिघांना जीवनदान तर दोन दृष्टिहीन बांधवांच्या आयुष्यात उजेड पेरला गेला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Girl Donated Her Organs before Died: अशिक्षित शेतकरी कुटुंबांत जन्माला आलेल्या मुलीने मृत्यूला कवटाळताना केलेल्या अवयव दानातून तिघांचे आयुष्य उजळून निघाले. तिघांना जीवनदान तर दोन दृष्टिहीन बांधवांच्या आयुष्यात उजेड पेरला गेला. समाजाने या शेतकरी कुटुंबापासून आदर्श घ्यावा अशी ही घटना उपराजधानीत घडली.

छिंदवाड्यातील अशिक्षित कुटुंबात जन्मलेली मुलगी पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत होती. प्रकृती बिघडल्याने नागपुरातील मेडिकलच्या ट्रॉमा युनियनमध्ये तिला दाखल केले. ९दिवसांच्या उपचारानंतर मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने तपासणी केल्यानंतर मेंदूमृत घोषित करण्यात आले. दरम्यान सुपरचे डॉ. सुनील वाशिमकर, डॉ. सुमित चाहाकार, डॉ. भाग्यश्री निघोट यांनी अवयवदानासाठी नातेवाईकांचे समुपदेशन केले.

दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही शेतकरी कुटुंबातील वडील, दोन भावांनी अवयवदानाला संमती दिली. तत्काळ विभागीय अवयवदान समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी प्रतीक्षा यादी तपासणीच्या सूचना दिल्या. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका महिलेसह इतर रुग्णालयात दोघांना किडनी व यकृत दान करण्यात आले.

प्रत्यारोपणातून यांचे उजळले आयुष्य

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील अवयवदानाच्या प्रतीक्षा यादीत किडनीच्या प्रतीक्षेत ३३ वर्षीय महिला होती. तत्काळ त्यांना सूचना देण्यात आली. दुसरी किडनी व्होकार्ट रुग्णालयातील ५५ वर्षीय पुरुषाला दिली. तर ६५ वर्षीय व्यक्तीला यकृत दान करण्यात आले. व्होकार्टमध्ये यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. (Latest Marathi News )

मेडिकलमधील नेत्रपेढीला नेत्रगोल दान करण्यात आले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहूल सक्सेना, सुपर स्पेशालिटीचे प्रभारी विशेष कार्य अधिकारी डॉ. भूषण महाजन, समितीचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपणाला सहकार्य केले. (Latest Marathi News )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT