Talathi fraud Panchnama  
नागपूर

Nagpur : तलाठीच उठला शेतकऱ्यांच्या जिवावर

बोगस पंचनामे करून शेतकऱ्यांचे केले नुकसान; निलंबित करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर : मर्जीतील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिक नुकसान झाल्याचे दाखविले तर, दुसरीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करण्याचा कारनामा तलाठ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मांडवा व इंदापूर येथील तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गावकऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन तलाठ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

मर्जीतील शेतकऱ्यांच्या शेताचे क्षेत्रफळ अधिक दाखवून त्यांना जास्त मदत राशी मिळवून देऊन शासनाची फसवणूक केली.तर अधिक शेती असलेल्यांचे अत्यल्प नुकसान दाखवून त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार तलाठ्याने केला. त्याला निलंबित करण्याची मागणी मांडवा

(लभान) व इंदापूर येथील शेतकऱ्यांनी केली. तलाठ्याने केलेल्या घोळामुळे फारच कमी मदत मिळालेल्या तसेच मदतीपासून वंचित राहावे लागलेल्या शेतकऱ्यांना नव्याने मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. २०२१ च्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीसाठी शासनाने मदत जाहीर केली होती.

ही मदतीची रक्कम नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली तर उरलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू आहे. मांडवा व इंदापूर येथील तलाठी संजय राठोड याने नुकसानीचे पंचनामे करताना मोठा घोळ घातला. काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे. त्यापेक्षा अधिक दाखवून त्यांना अधिक मदत मिळवून दिली. तर काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाही त्यांचे अत्यल्प नुकसान झाल्याचे दाखवून त्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

मांडवा येथील काही तरुण शेतकऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. बालू किसन पवार यांची ०.३२ हेक्टर आर. शेती असताना ती २.०० हेक्टर, मेश्राम रायसिंग जाधव यांची १.०४ शेती असताना ती २.०० हेक्टर, दुर्गासिंग चव्हाण यांची ०.८१ हेक्टर असताना ती सुद्धा २.०० हेक्टर दर्शवून नुकसान अधिक झाल्याचे बोगस पंचनामे तलाठ्याने तयार केले. सदर पंचनाम्याच्या आधारे त्यांना भरपाईची रक्कम २० हजारांपर्यंत व काहींना त्यापेक्षा अधिक मिळाली.

दुसरीकडे दामोधर चव्हाण यांच्या ४.०७ हेक्टर शेतीत नुकसान केवळ एक एकर, प्रभू राठोड यांच्या २.८८ हेक्टर शेतीत अर्धा एकर, अशोक राठोड यांच्या ३.६० हेक्टर शेतीत अर्धा एकरात नुकसान झाल्याचे दाखवून त्यांना मदतीपासून वंचित केले. त्यांना प्रत्येकी केवळ २ हजारांची मदत प्राप्त झाली. या घोळामुळे सप्रमाण आकडेवारी सादर करून शेतकऱ्यांनी तलाठी संजय राठोड याचे पितळ पत्रपरिषदेत उघडे पाडले.

पत्रपरिषदेला प्रवीण चव्हाण, अनिष चव्हाण, सुभाष चव्हाण, अजय राठोड, दामोधर चव्हाण, तुळशीराम राठोड, आनंदराव राठोड, मिथुन राठोड, रवींद्र पवार, सदू मेघावत, कुसुम गुलाबराव घरत आदींसह मांडवा व इंदापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

तलाठी संजय राठोडला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याची मागणी यापूर्वी तहसीलदारांकडे करण्यात आल्याचे सांगून मागणी पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून पत्रपरिषदेत देण्यात आला. याबाबत तलाठी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

शेतकऱ्यांच्या बोगस पंचनाम्याची दखल घेण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून दिली. ती रक्कम तलाठ्याकडून वसूल करण्यात येईल.

- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Level : कोल्हापूर-सांगलीवर पुन्हा महापुराचे सावट? कर्नाटक सरकारने नियम मोडल्याने चिंता वाढली, आलमट्टीत पाणी पातळी 518.88 मीटरवर..

Devendra Fadnavis: मी महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीतील नियुक्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पूर्णविराम

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात आज महत्त्वाची सुनावणी; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात 2 याचिका दाखल

Thane News: शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस! हनुमान धबधब्याला पूर, ५ जण गेले वाहून; थरारक व्हिडिओ व्हायरल

WI vs PAK 1st Test: बाबर आझम पुन्हा अपयशी... विंडीज पाकिस्तानी कर्णधाराने संतापून हेल्मेटवर मारली बॅट Video Viral

SCROLL FOR NEXT