Aims Hospital Doctors sakal
नागपूर

Kidney Donate : वडिलांनी किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

आपल्या मुलांसाठी आईवडिलांची नेहमीच त्याग करण्याची वृत्ती असते. याचा अनुभव मंगळवारी (ता.९) एम्समध्ये आला. ३४ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी आपली किडनी दान केली.

सकाळ वृत्तसेवा

आपल्या मुलांसाठी आईवडिलांची नेहमीच त्याग करण्याची वृत्ती असते. याचा अनुभव मंगळवारी (ता.९) एम्समध्ये आला. ३४ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी आपली किडनी दान केली.

नागपूर - आपल्या मुलांसाठी आईवडिलांची नेहमीच त्याग करण्याची वृत्ती असते. याचा अनुभव मंगळवारी (ता.९) एम्समध्ये आला. ३४ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी आपली किडनी दान केली. लेकराला नव्याने जीवनदान दिले. मध्य भारतात लाइव्ह ‘किडनी प्रत्यारोपणा’ ची यशस्वी शस्त्रक्रिया करणारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ही दुसरी शासकीय संस्था आहे.

बालाघाट येथील ३४ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. वर्षभरापासून तरुण डायलिसिसवर होता. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान आरोग्य विभागाकडून ‘एम्स’ला अवयव प्रत्यारोपणाची मंजूर मिळाली. ५७ वर्षीय वडिलांनी नेफ्रोलॉजी विभागात उपचार घेत असलेल्या मुलाला किडनी दान करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यानुसार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमोल भवाने आणि डॉ. आनंद चेल्लापन यांच्यासह डॉ. चंद्रकांत मुंजेवार, डॉ. नीलेश नागदेवे, डॉ. नीलकमल मेश्राम, डॉ. अमृषा रायपुरे, डॉ. बरखा अग्रवाल, डॉ. मोहन सुंदरम, डॉ. भुवनेश्वरी यांच्या पथकाने ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. नातेवाइकांच्या परवानगीने विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष तसेच यूरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण केली.

मंगळवारचा योगायोग...

मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीत ९ फेब्रुवारी २०१६ रोजी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात पहिले किडनी प्रत्यारोपण झाले होते. शासकीय संस्थेतील ते पहिले किडनी प्रत्यारोपण होते. तो दिवस मंगळवार होता. एम्समध्ये ९ मे २०२३ रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांच्याच मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण झाले. ९ मे रोजी देखील मंगळवार आहे. दोन्ही शासकीय संस्थेत पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले तोही दिवस योगायोगाने मंगळवार होता.

एम्स उपचारासोबतच संशोधन संस्था आहे. किडनी प्रत्यारोपणातून आता खऱ्या अर्थाने आरोग्याच्या विकासाला चालना मिळाली. एम्सचे संचालक डॉ. एम. हनुमंत राव यांच्या मार्गदर्शनात लाइव्ह किडनी प्रत्यारोपण झाले. येत्या काळात अवयवदानाच्या प्रचार व प्रचारासोबतच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतील.

- डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT