crime news  sakal
नागपूर

Nagpur : मध्यस्थी केली, अन् जीव गमावून बसला

क्षुल्लक कारणावरून दोन गटात भांडण

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट : क्षुल्लक कारणावरून दोन गटात भांडणाला सुरुवात झाली. वृद्ध भांडण सोडविण्यासाठी गेला आणि एका गटाने त्यांनाच मारहाण केली. या मारहाणीत त्या वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून ही घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालईधाबा नजीकच्या गवळी वस्ती येथे रविवारी (ता.२८) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

जेठा मेर (६७, गवळी बेळा, सालईधाबा, ता. हिंगणा) असे मृताचे तर दशरथ वरठी (४०), श्रावण वरठी (४०), अतुल दुर्वे (३७), राजेश कोहळे (३५), रामकृष्ण राऊत (३८), ज्ञानेश्वर डेरकर (३४, सर्व रा. पोही, ता. हिंगणा) व नीलेश सलामे (३५, रा. सालईधाबा, ता. हिंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोही येथील मनीष वरठी हा रविवारी रात्री सालईधाबा येथील गवळी वस्तीवर आला होता.

त्यावेळी गोपाळ राठोड (१९) याचे काका लाला मेर यांनी मनीषला तू इतक्या रात्री येथे काय करतोस, अशी स्वाभाविक विचारणा केली. त्यावर चिडलेल्या मनीषने शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे लाला मेर यांनी मनीषला एक थप्पड मारली. त्यावर मनीष तुला बघून घेईन, असे म्हणत तिथून निघून गेला. काही वेळाने मनीष त्याच्या काही साथीदारांना घेऊन गवळी वस्तीवर आला. त्या सर्वांनी लाला मेर यांच्याशी भांडण उकरून काढत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच जेठा मेर हे मध्यस्थी करायला व भांडण सोडवायला मध्ये गेले. मात्र, आरोपींनी त्यांनाही जबर मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने ते खाली कोसळले. यात जेठा मेरा यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून सात आरोपींना लगेच ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या मदतीने मोठी घटना टळली

नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने ठाणेदार अशोक कोळी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी जेठा मेरा जखमी अवस्थेत खाली कोसळले होते. पोलिसांनी जेठा मेरा यांना लगेच बुटीबोरी येथील रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे, पोलिसांनी दोन्ही गटातील म्होरक्यांची समजूत काढून भांडण तात्पुरते मिटवले. त्यामुळे दोन गटातील मोठी घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT