Nagpur fire at Gorewada forest animal safe fire brigade sakal
नागपूर

नागपूर : गोरेवाडा जंगलात आग, प्राणी सुरक्षित

अग्निशमन विभागाचे दोन बंब व चार टॅंकर घटनास्थळी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गोरेवाडा येथील जंगलामध्ये आज दुपारी एक वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने दोन बंब व चार टॅंकर घटनास्थळी पाठवले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून सर्व प्राणी सुरक्षित असल्याचे अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी नमुद केले.

गोरेवाडा येथील जंगलात आग लागल्याने रविवारची सुटी साजरी करण्यासाठी पर्यटनाकरिता आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. दुपारी एक वाजताच्या सुमारास जंगलातील गवताला आग लागली. यात काही झुडपंही जळाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने सुरुवातीला सिव्हिल लाईनमधील केंद्रातून एक बंब घटनास्थळी रवाना केला. आगीची तीव्रता बघता काही वेळा पुन्हा एक बंब पाठविण्यात आला. त्यानंतर चार टॅंकरही रवाना करण्यात आले. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु उन्ह अधिक असल्याने व आग पुन्हा लागण्याच्या शक्यतेमुळे गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्रातून आणखी एक बंब मागविण्यात आला. एक बंब जंगलामध्येच ठेवण्यात आला. या आगीत प्राण्यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT