fire  sakal
नागपूर

Nagpur Fire News : महात्मा फुले मार्केटला मध्यरात्री भीषण आग

Nagpur Fire News : महात्मा फुले मार्केटला मध्यरात्री भीषण आग

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

नागपूर - महात्मा फुले भाजी बाजाराला मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने चार ते पाच दुकाने जळून खाक झालीत. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुठलीही प्राणहाणी झाली नसली तरी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

कॉटन मार्केट परिसरात दिवसभर वर्दळ असते. रात्री बारा नंतर येथे विविध राज्यांमधून भाज्यांचे ट्रक येणास सुरुवार होते. पहाटेपर्यंतपासून स्थानिक भाजी विक्रेत्यांची वर्दळ असते. मंगळवारी रात्री अचनाक काही दुकानांमधील साहित्याने पेट घेतल्याने खळबळ उडाली. येथील भाजांच्या दुकानांवरील छत टिना आणि लाकडी जाळ्यांचे आहेत. ठोक भाजी विक्रेत्यांनी भाज्या ठेवण्यासाठी लाकडाचे धाबे तयार केले आहेत. त्यामुळे झटपट पेट घेतला. त्यात दुकाने जळून खाक झाली.

येथील दुकानातील कम्प्युटर व फर्निरचही जळलाहे. मात्र परिसरात भाजी विक्रेते व मजुरांच्या ही बाब निदर्शनास येताच तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेस सूचना देण्यात आली. अग्निशमन विभागाने तत्काळ आगीवर नियंत्रण आणले. भाजीचे ठोक विक्रेत शेख हुसेन, गुमगावकर यांच्यासह अनेकांची दुकाने यात जळाली.

कोरनाच्या काळतही महत्मा फुले भाजीबाजारात मोठी आग लागली होती. त्यावेळी चाळीस ते पन्नास दुकाने जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. दोन वर्षांत पुन्हा आग लागल्याने घातपाताची शंकाही काहींनी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष येथील भाजी विक्रेत्यांनी बाजाराला अत्याधुनिक करण्यासाठी महापालिकेकडे २००४ साली पैस भरले होते.

मनपानेसुद्धा याकरिता ९० कोटी रुपये सभागृहात मंजूर केले होते. मध्यंतरी हा बाजार कळमना येथे हलवण्याचे प्रयत्न झाला होता. मात्र मध्यवर्ती ठिकाण असल्याने व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शवला. या विरोधात येथील व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने व्यापाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी महापालिकेतर्फे नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला जात नाही. न्यायालयाने २००४ ते २०१० या दरम्यान महात्मा फुले बाजाराच्या विकासासाठी काय केले अशी विचाराण महापालिका आयुक्तांकडे केली होती. तेव्हा तत्कालीन आयुक्तांनी एक वर्षांत नवे संकुल उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

भाजी बाजारात वारंवार आगी लागतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकासान होत आहे. मागील तीन वर्षांत तीन आगील लागल्या. येथील दुकाने कच्ची आहेत. त्यामुळे कंपन्या विमा काढत नाही. आग लागल्यास मोठा फटका भाजी विक्रेत्यांना बसतो. पूर्वी चार ते पाच हजार रुपये महापालिका भाडे आकारत होती. त्यात ५० ते ६० हजार रुपये अशी अवाढव्य वाढ केली आहे. त्याबदल्यात काही सुविधा दिल्या जात नाही.

राम महाजन, सचिव, महात्मा फुले अडतिया असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

अखेर तेजश्रीने करून दाखवलंच! 'वीण दोघातली...'ची टॉप ५ मध्ये एंट्री; स्टार प्रवाहच्या या मालिकांचा TRP घसरला, कोण कितव्या स्थानी?

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

SCROLL FOR NEXT