Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray sakal
नागपूर

Nagpur : ‘फडतूस’ म्हणजे काय रे भाऊ; सोशल मिडियावर चर्चा

दिवसभरात प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकाळपासून राज्याचे राजकारण आता एकाच शब्दावर केंद्रित झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. ‘फडतूस’ हा एकच शब्द आज प्रत्येकाच्या ओठातून बाहेर पडला. यात राज्यातील मोठे नेतेही अपवाद नव्हते. नेहमीच वापरात असलेल्या या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्याबाबतही काहींमध्ये उत्सुकता दिसून आली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना ‘फडतूस’ म्हणाले. भाजप कार्यकर्ते यावर संताप व्यक्त करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्राने पाहिले’, असे नमूद करीत जशास तसे उत्तर दिले. यानंतर या शब्दावरून राज्यात चांगलाच धुरळा उडाला. दिवसभरात प्रत्येकानेच मित्र, कौटुंबिक वातावरणातही हा शब्द पुकारला. सोशल मीडियावर तर या शब्दाच्या अनुषंगाने प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.

‘फडतूस’ म्हणजे काय रे भाऊ; सोशल मिडियावर चर्चा

अनेकांना एखादी क्षुल्लक बाब किंवा दुर्लक्षित करण्यासारखी बाब म्हणजे ‘फडतूस’ एवढेच माहित आहे. परंतु अनेकांनी आज या शब्दाचा अर्थही शोधण्याचा प्रयत्न केला. काहींनी सोशल मिडियावर फडतूस म्हणजे काय रे भाऊ, असाही प्रश्न उपस्थित केला. त्यावर अनेकांनी काहीही उत्तर दिले. हा शब्द नेमका कसा तयार झाला, अशी विचारणाही अनेकांनी केली. यावर काहींनी अतिशय समर्पक अशी व्याख्या केली आहे.

ट्विटरवर मनोज पाटील नावाच्या गृहस्थाने ‘फडतूस’ शब्द कसा तयार झाला, याबाबत पोस्ट केली आहे. शेतामध्ये धान्य साठवण्याची जागा असते. या जागेत धान्याचा, कणसाचा ढीग ठेवला जातो. त्याला ‘फड’ म्हणतात. शेतातून काढलेल्या धान्याला साल असते.

त्याला ‘तूस’ म्हटले जाते. धान्य स्वच्छ केले जाते, त्यावेळी त्याचे तूस किंवा फोलपट दुसरीकडे जमा होते, अर्थात त्याचा फड तयार होतो. तूस किंवा फोलाचा हा ढीग टाकाऊ असतो. त्याचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. या तुसाचा फड म्हणजे ‘फडतूस’, अर्थात काहीच कामाचा नसलेला, अशी व्याख्या पाटील यांनी केल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर ‘ट्रेंड’

आज अनेकांनी सोशल मिडियावर ‘फडतूस’ हा शब्द ट्रेंड केला. अनेक कार्यकर्त्यांनी या शब्दासह काही नेत्यांवर संताप व्यक्त केला. दोन पक्षाचे कार्यकर्ते या शब्दावरून सोशल मीडियावर चांगलेच भिडल्याचे दिसत आहे. यात नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा शब्द आता सोशल मीडिया वापरकर्त्या हिंदी भाषिकांनाही चांगलाच माहीत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT