आज गुंजणार गण गणात बोतेचा गजर
Nagpur Gajanan Maharaj: श्री संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त रविवारी (ता.३) शहरातील विविध भागांमधील मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रवचन, कीर्तन, देवी भागवत, भजन, सामूहिक पारायण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
त्या निमित्ताने गजानन महाराज मंदिरावर आकर्षक रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे. मंदिरातून पालख्या काढण्यात येणार आहे. त्रिमूर्तीनगरातील श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाभावी मंडळाच्या श्रीगजानन महाराजांच्या पालखीत नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मध्यप्रदेशातील ६०० ते ७०० दिंड्या सहभागी होणार आहेत. रविवारी गण गण गणात बोतेचा गजर शहरभर गुंजणार आहे.
गोधनीतील मंदिरात पालखी व महाप्रसाद वितरण
संत गजानन महाराज देवस्थान गोधनी येथील मंदिरात २८ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. श्रींची पालखी दरवर्षी प्रमाणे शनिवारी काढण्यात आली. रविवारी पालखीनंतर या भव्य मंदिरात हजारो भक्त दर्शनाला येतात. सायंकाळी ५ वाजतानंतर महाप्रसाद वितरणाचे आयोजनही केले आहे. (Latest Marathi News)
जयप्रकाशनगरात प्रगटदिनोत्सवाला प्रारंभ
श्री संत गजानन महाराज देवस्थान जयप्रकाशनगर खामला येथील तपोवन कॉम्प्लेक्समध्ये प्रगटदिनोत्सवाला प्रारंभ झाला. रेशीमबाग येथील श्री संत गजानन महाराज येथे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा प्रगटदिनोत्सवानिमित्ताने उद्या सकाळी ८ वाजता श्रींच्या रथयात्रेचा नामस्मरण पालखी सोहळा होईल. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास डांगरे आणि आमदार मोहन मते उपस्थित राहतील. त्यानंतर श्रींना अभिषेक, फुलांची शेज आणि दुपारी १ वाजता श्रींची मंगल आरती होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.