Nagpur Crime News esakal
नागपूर

Nagpur Crime News: ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी

जबिनाला गांजा बंगरुळू येथे नेण्यास सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ट्रॅव्हल्समधून नागपूरमार्गे बंगरुळू येथे गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला धंतोली पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (ता.१५) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास केली.

जबिना खान (वय ३२, रा. माहूर, नांदेड) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबिना अजनी चौकात ऑरेंज ट्रॅव्हल्समध्ये बसत असताना, तेथील वाहतूक पोलिसांना गांजाचा वास आला. त्यांनी बस थांबवून धंतोली पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फरताडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अजनी चौकात जाऊन महिलेच्या बॅगची झडती घेतली असता, तिच्याकडे १३ किलो गांजा आढळला.

ताब्यात घेऊन विचारणा केली असता, हा गांजा बंगरुळू येथे घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये जबिनाला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.

कॅरिअर म्हणून वापर

जबिनाला गांजा बंगरुळू येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ती माहूर येथून नागपुरात आली. गणेशपेठ स्थानक परिसरातून बसल्यास शंका येण्याची शक्यता असल्याने तिने अजनी येथून बसण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तेथील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. बंगरुळूमध्ये गांजा नेमका कोणाला द्यायचा, हे तिला तिथे गेल्यावर सांगण्यात येणार होते, अशी माहिती तिने दिले. त्यामुळे केवळ ‘कॅरिअर’ म्हणून तिचा वापर करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT