Nagpur Garage Fire, 20 Bikes Damage

 

sakal

नागपूर

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Nagpur Garage Fire, 20 Bikes Damaged, CCTV Probe प्रकरणात कपिलनगर परिसरातील गॅरेजला आग लागून सुमारे २० दुचाकींचे नुकसान झाले. माजी कर्मचाऱ्यावर संशय असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, : नोकरीतून काढल्याच्या रागातून कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजला आग लावल्याचा प्रकार कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनीतील बाबा दीपनगर शुक्रवारी (ता.२) पहाटे उघडकीस आला. या आगीत गॅरेजमधील सुमारे २० दुचाकी जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे, तर शेजारील क्लिनिकचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बँक कॉलनीत बाबा दीपनगर येथील रहिवासी सतीश यादव (वय ४२) यांचे ‘दिवेश होंडा सर्व्हिस’ नावाचे गॅरेज आहे. राजू महेंद्रकर हा तेथे काम करीत होता. दारूच्या व्यसनामुळे सतीश यादव यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी राजूला कामावरून काढले होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास गॅरेजमध्ये आग लागली. काही वेळातच आगीने गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना वेढले. सुमारे २० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आगीच्या झळांमुळे शेजारील विकास गिरी यांच्या क्लिनिकचेही नुकसान झाले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली असता, त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. याशिवाय कपिलनगर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान नोकरी गेल्याच्या रागातून गॅरेजला आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान नोकरी गेल्याच्या रागातून त्यानेच गॅरेजला आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्हीत संशयिताच्या हालचाली घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गॅरेजमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात एक व्यक्ती गॅरेजच्या परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. या फुटेजसह अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास केला जात आहे.

दहा हजारांच्या वादातून २४ कोटींचे नुकसान कपिलनगरातील आगीच्या घटनेतून सुरतमधील घटनेला उजाळा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये सुरतच्या श्याम संगिनी टेक्सटाइल मार्केटमध्ये माजी रोखपालाने १० हजार रुपये वेतन थकीत असल्याच्या कारणातून झालेल्या वादातून आग लावल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. या आगीत चार व्यापाऱ्यांचा सुमारे २४ कोटी रुपयांचा माल जळाल्याचा प्राथमिक अंदाज होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विनोद सावले याला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

SCROLL FOR NEXT