चंद्रग्रहण  sakal
नागपूर

Nagpur : खगोलप्रेमींसाठी आठ नोव्हेंबरला सुवर्णसंधी

शहरात दिसणार शेवटचे चंद्रग्रहण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऑक्टोबर महिन्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहिल्यानंतर खगोलप्रेमींना आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजता तर मुंबईत ६ वाजून एक मिनीटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. ७ वाजून २६ वाजता ग्रहण संपणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के तर पश्चिम प्रदेशात १५ टक्के ग्रहण दिसणार आहे अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. देशात पूर्वोत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल. तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल

आठ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, येथील काही भागातून दिसेल. पूर्वोत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल. परंतु, चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. आठ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३२ मिनीटांनी छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरवात होईल. २ वाजून ३९ वा खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल. ३ वाजून ४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होणार आहे. ५ वाजून ११ मिनिटांनी खग्रास ग्रहण समाप्त होईल. ७ वाजून २६ मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT