Govt Mega Recruitment for Talathi bharati 2023 Advertisement for 4644 posts published mumbai esakal
नागपूर

Nagpur : तलाठी पदभरती अर्ज प्रक्रियेत खोळंबा, ऐन शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद; हेल्पलाईनही हेल्पलेस

सरकारचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

योगेश फरपट

नागपूर - महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज १७ जुलै शेवटचा दिवस आहे. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाईट बंद दाखवत आहे. आता अर्ज भरण्यासाठी केवळ काही तासच उरले असल्याने अनेक उमेदवारांना चिंता लागली आहे.

बहुप्रतिक्षेत असलेली तलाठी पदभरती अखेर शिंदे फडणवीस सरकारने काढली. पहिल्यांदाच साडेचार हजारहून अधिक तलाठ्याची पदे भरली जाणार आहेत. ही परिक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून चाचणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. परिक्षेच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील.

आॅनलाईन परिक्षेप्रमाणेच अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा आॅनलाईनच आहे. २६ जूनच्या रात्री १२ वाजेपासून तर १७ जुलैच्या रात्री ११.५५ पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेबसाईट खुली ठेवण्यात येईल असे जाहिर करण्यात आले आहे. ई-महाभूमी या महसूल व वनविभागाच्या वेबसाईटवर तलाठी पदभरतीची आॅॅनलाईन लिंक उपलब्ध आहे.

मात्र ही वेबसाईट ऐन शेवटच्या दिवशी म्हणजे आज सकाळी ११वाजेपासून बंद दाखवत असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. वेबसाईट अंडर मेंटनन्स असून संध्याकाळी ६ वाजता सुरु होईल तलाठी पदभरतीसाठी अर्ज भरता येत नाहीयेत.

वेबसाईट अंडर मेंटनन्स असल्याचा मॅसेज डिस्प्ले होत असून १७ जुलैरोजी संध्याकाळी ६ वाजता चेक करावे असा मॅसेज येत आहे. शेवटच्या दिवशीच वेबसाईट अंडर मेंटनन्स कशी असू शकते असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

असून महसूल विभागाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याने शिंदे फडणवीस सरकारबद्दल तलाठी पदभरतीच्या उमेदवारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आमचा अर्ज जर भरला गेला नाहीतर याला सरकार जबाबदार असेल असा आरोप केला आहे.

हेल्पलाईनही नो-रिस्पॉन्स

अर्ज भरतांना काही अडचण असल्यास 91-9513438043 (टेक्नीकल) व 02025712712 (नॉन टेक्निकल) असे दोन हेल्पलाईन नंबरही दिले आहेत. मात्र दोन्ही नंबर बंद आहेत. पहिल्या नंबरवर काॅल जातोय. पण काॅल कनेक्ट होत नाहीये. तर दुसरा नंबर तर उचलला जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

India vs Australia 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ विजयाचे फटाके फोडणार? रोहित-विराट पुन्हा असेल केंद्रस्थानी...

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज....

Gold Prices Fluctuate : सोन्याचा दर सकाळी वाढला, रात्री घटला; दर काय राहणार सराफ व्यावसायिकांचे लक्ष

'शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलं असेल'; वादानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT