Nagpur Grocery cosmetics supermarket fire four storey building sakal
नागपूर

नागपूर : चार मजली इमारतीतील सुपर बाजारला आग

किराणा, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने जळाली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील झिंगाबाई टाकळी परिसरातील पुरुषोत्तम सुपर बाजाराला शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत नऊ लाखांचे साहित्य जळाले. चार मजली इमारतीतील ग्राउंड फ्लोअरवरील सुपर बाजाराला लागलेल्या आगीमुळे येथील रहिवाशांच्या काळजीने अनेकांनी धाव घेतली. परंतु अग्निशमन विभागाच्या जवानांनी तासाभरातच ग्राउंड फ्लोअरवरील आगीवर नियंत्रण मिळवल्याने इमारतीतील नागरिकांची मालमत्ता व जीव दोन्ही वाचले.

झिंगाबाई टाकळी मुख्य रस्त्यावर अर्चना रिवेरा ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत ग्राउंड फ्लोअरवर गेल्या अनेक वर्षांपासून संजय छाबरिया व अंकित अग्रवाल यांच्या मालकीचा पुरुषोत्तम सुपर बाजार आहे. पहिल्या माळ्यापासून ते चौथ्या माळ्यापर्यंत निवासी गाळे आहेत. अनेक नागरिक येथे खरेदीसाठी येतात. परंतु आज सकाळी सात वाजताच्या सुमारास सुपर बाजार उघडण्यापूर्वीच आग लागली.

सुपर बाजारातून धूर बाहेर निघत असल्याचे दिसताच सुरक्षा रक्षक व परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आग सुपर बाजारात पसरली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु सुपर बाजारातील किराणा साहित्य, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, पीओपी, वीजेच्या तारा, पंखे, कुलर आदी जळाले.

परंतु आगीवर लवकरच नियंत्रण मिळाल्याने काही किराणा तसेच साहित्य वाचविले. परत ते विक्रीसाठी योग्य नसल्याचे समजते. एकूण नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ५५ लाखांची बचत करण्यात अग्निशमन विभागाला यश आल्याचेही अधिकाऱ्यांनी नमुद केले.

निवासी लोकांत दहशत

ग्राउंड फ्लोअरवर आग लागल्याने इमारतीतील पहिल्या ते चौथ्या माळ्यावरील रहिवासी नागरिक मुले, वृद्धांसह बाहेर आले. परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. आगीमुळे या इमारतीतील नागरिक दहशतीत दिसून आले. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: सर्वसामान्यांना स्वप्नातलं घरं मिळणार, सिडको १९ हजार घरे बांधणार; पण कुठे आणि कधी?

AI for Breakup Recovery : अपयशी प्रेमीयुगुलांना सावरतोय 'AI'; 'मूव्ह ऑन'साठी दुखावलेल्या Gen-Z च्या मनावर फुंकर

Mumbai News: हजार कोटींच्या चार निविदा रद्द, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

RBI Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Akola : गटाराच्या पाण्याने बनतोय नाश्ता; व्हिडिओ व्हायरल होताच मनपाची कारवाई, अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT