Mobile Theft Sakal Digital
नागपूर

नागपूर : रिंग टोन वाजताच मोबाईल चोर सापडला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मोबाईल चोरी केल्यानंतर त्यावर सतत फोन येत होते. समोर पोलिस होती. उचलून फोन सतत कट करणेही जमत नव्हते. अखेर पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. चौकशीत मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून डोंगरगढ येथे प्रकरण वर्ग करण्यात आले. ही घटना कोचुवेली एक्स्प्रेसमध्ये घडली. अजी कोडीकुंज (४२) रा. निलमबेल्ली असे तक्रारकर्त्या प्रवाशाचे नाव आहे.

ते कोचुवेली एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. झोपेत असताना आरोपीने त्यांच्याकडील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. त्यांना जाग आल्यावर मोबाईल दिसला नाही. त्यांनी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना सांगितले. जवानांनी लगेच धावत्या गाडीत शोध घेतला. गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर असताना कोच बी-७ मधील एका प्रवाशा जवळील मोबाईलची वारंवार रिंगटोन वाजत होती. मात्र, तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बी-४ कोचमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्याला नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून डोंगरगड येथे प्रकरण वर्ग केले.

तसेच सुमीत बॅन (३३) रा. सावनेर हे केळवद रेल्वे स्थानकावर असताना आरोपी अंकित परतेती (१९) ने त्यांच्याजवळील ३५ हजार रुपये चोरले. या प्रकरणी इतवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्याचे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपवर पाठविण्यात आले. त्यावरून पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडू ४ हजार ९०० रुपये जप्त केले. उर्वरित रक्कम खर्च झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT