Nagpur Hingana BBA student commit suicide sakal
नागपूर

नागपूर : बीबीएच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

हिंगणा येथील संत गाडगे नगर येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिंगणा येथील संत गाडगे नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पावणेदहाच्या सुमारास घडली.

प्रथम दामोधर गरपल्लीवार असे विद्यार्थ्याचे नाव आहे. मुळचा चंद्रपूर येथील असलेला प्रथम रायसोनी महाविद्यालयातील बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. परवा त्याने घरी सिलिंग फॅनला चादरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान प्रथम न दिसल्याने घरमालकांनी दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यानी दार तोडून आत प्रवेश केला.

त्यावेळी प्रथम लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी याची सूचना एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासणी केली असता, तिथे त्याने लिहिलेले पत्र आढळले. त्यात माझा मृत्यूला कुणीही जबाबदर नसल्याचे लिहिले आहे. मात्र, काही दिवसांपासून तणावात असल्याचे सांगण्यात येते. त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली ते कळू शकले नाही. याप्रकरणी स्नेहा रमेश मुकुंद (वय ३०) यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT