Hingna MIDC  Esakal
नागपूर

Hingna: हिंगणा एमआयडीसी म्हणजे अस्वच्छतेचे माहेरघरच; हजारोंना दिला रोजगार पण खड्ड्यांमुळे MIDC झाली बकाल

स्वच्छ भारत अभियान सुरू असले तरी हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीत अस्वच्छतेचे माहेरघर झाले आहे. अर्धशतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या औद्योगिक वसाहतीत हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hingna MIDC Garbage: स्वच्छ भारत अभियान सुरू असले तरी हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीत अस्वच्छतेचे माहेरघर झाले आहे. अर्धशतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या औद्योगिक वसाहतीत हजारो लोकांना रोजगार दिला आहे. मात्र, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित ग्रामपंचायतीकडून स्वच्छता कर वसूल केला जात असला तरी संपूर्ण एमआयडीसी बकाल झालेली आहे.

रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे परिसराची ओळख खड्ड्यांची नगरी म्हणून होण्याची वेळ आली आहे, असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आणि गटारातील पाणी वारंवार रस्त्यावर वाहते, अशी या क्षेत्राची स्थिती आहे. कारखान्यांमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी सिव्हरेज लाईनचा अभाव आहे. रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी असोसिएशन आणि उद्योजकांना स्व:खर्चाने गाडी मागवावी लागते.

कामगारांचे आरोग्य धोक्यात

हिंगणा औद्योगिक वसाहतीत १८९० एकरात १६६१ प्लॉट आहेत. यातील १२०० पेक्षा अधिक ठिकाणी उद्योग सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर शोरूम उभ्या राहिल्या आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास ७५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. त्यातील काही उद्योग २४ तास सुरू राहतात. घाण पाणी वाहून जात नसल्यामुळे बहुतांश कारखान्यांमध्ये टाक्या तयार करण्यात आल्या आहेत.

टाक्या पूर्णपणे भरल्यानंतर रिक्त करण्यासाठी उद्योजकांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यासाठी अधिकचा भूर्दंड सोसावा लागत आहे. काही जण कचरा खुल्या मैदानात टाकतात. परिणामी, कचऱ्याचे ढिगारे तयार झाल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.

अशी आहे हिंगणा एमआयडीसी

जवळपास ५५ वर्षांपूर्वी स्थापना.

स्थापनेपासून सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही.

हिंगणा एमआयडीसी १८९० एकर जागेत, १६६१ प्लॉटचे वितरण.

१३०० पेक्षा कमी कारखान्यांमध्ये उत्पादन.

जवळपास ७५ हजार जणांना रोजगार.

हिंगणा एमआयडीसीचे अधिकारी वरच्यावर स्वच्छता मोहीम राबवित असतात. ती स्वच्छता म्हणजे सोपस्कार असतात. त्यामुळे असोसिएशन आणि उद्योजकांना पुढाकार घ्यावा लागतो. औद्योगिक रसायनयुक्त पाण्याला टाकीमध्ये जमा करावे लागते. त्यामुळे आजाराचा धोका निर्माण होतो. या संदर्भात एसआयसीला पत्र लिहिले आहे, पण अधिकारीही याकडे काणाडोळा करतात. मात्र कर वसुलीसाठी पुढाकार घेतात.- कॅ. सी.एम. रणधीर, अध्यक्ष, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT