Nagpur Car Crushed People esaka
नागपूर

Nagpur Car Crushed People: नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट! चौकशीत दिरंगाई... पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Nagpur Car Crushed People: महाराष्ट्रात हिट अँड रनचे आणखी एक प्रकरणा वाढ होत आहे. पुण्यात हिट अँड रन प्रकरणात 2 जणांचा मृत्यू झाला होता. आता नागपुरात हिट अँड रनचे प्रकरण समोर आले.

Sandip Kapde

Nagpur Car Crushed People:

नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिघोरी टोल नाक्यावर अपघात घडून 48 तास लोटलेले आहे. मद्य धुंद अवस्थेत भरधाव कार चालवत फुटपाथवर झोपलेल्या आठ लोकांना चिरडण्यात आले होते. यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले होते. जखमीत लहान बालकाचाही समावेश होता. मात्र या प्रकरणात चौकशीत दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे.

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र ते रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब म्हणजेच न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत पाठवण्यात आले नसल्यामुळे यात झालेल्या कामाच्या कुचराईमुळे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी निलंबित केलं आहे. (Nagpur Crime News)

विजय दिघे यांच्या यापूर्वी अनेक तक्रारी असल्यासही समोर आलं आहे. त्यामुळे आधी बदलीची कारवाई करण्यात आली होती नंतर पोलीस आयुक्तांनी त्यांचे थेट निलंबन केले.

आरोपी चालकासह कारमध्ये सहा विद्यार्थी होते. त्यातील सर्वच जण दारूच्या नशेत वाढदिवस साजरा करून फिरायला निघाले होते. भूषण नरेश लांजेवार (२० रा. दिघोरी) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. राजेंद्र बागडिया (३४) यांच्या तक्रारीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. कांतीबाई गजोड बागडिया (४२) आणि सीताराम बाबूलाल बागडिया (३०) दोन्ही रा. करवर, अरियाली (जि. बुंदी, राजस्थान) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

तर कविता बागडिया (२८), बुलको बागडिया (८), हसीना बागडिया (३), सकीना बागडिया (दीड वर्ष), हनुमान बागडिया (३५), विक्रम ऊर्फ भूषा (१०) आणि पानबाई (१५) अशी जखमींची नावे आहेत. मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी हसीना आणि सकीनाची प्रकृती चिंताजनक आहे. वाठोडा पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपींना पकडले. इतर आरोपींमध्ये वंश राजू झाडे (१९) रा. योगेश्वरनगर वाठोडा, सन्मय दिगांबर पात्रिकर (२०) रा. अंबानगर दिघोरी, अथर्व सरीता बानाईत (२०) रा. अयोध्यानगर हुडकेश्वर, ऋषिकेश धनंजय चौबे (२०) रा. रामेश्वरी अजनी, अथर्व मोगरे (२०), रा. महाल यांचा समावेश आहे.

केक कापून निघाले फिरायला-

रविवारी वंशचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी त्याने घरी मित्रांना बोलाविले. आई-वडील आणि मित्रांच्या उपस्थितीत त्याने केक कापला. आई बाबांचा आशीर्वादही घेतला. वंशचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत. वंश हा बी. फार्मचे शिक्षण घेत आहे. तर इतर आरोपी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत. घरी पार्टी केल्यानंतर सर्व मित्र भूषणच्या कारने फिरायला निघाले होते.

वीस जण रांगेत झोपले होते-

बागडिया कुटुंबात जवळपास २० लोक राहतात. घटनेच्या वेळी राजेंद्र बागडिया (३४) यांच्यासह इतर लोक सुद्धा फुटपाथवरच झोपले होते. हे सर्वच जण रांगेने झोपले होते. मात्र, काहींचे नशीब बलवत्तर होते म्हणून ते वाचले. त्यांना साधी जखम सुद्धा झाली नाही. समोर झोपलेल्यांच्या अंगावरून चिरडत कार निघून गेली.

रोजगारासाठी आले होते राजस्थानी कुटुंब-

रोजगाराकरिता राजस्थानचे बागडिया कुटुंब नागपुरात आले होते. दिघोरी टोल नाक्याजवळील फुटपाथवर त्यांनी अस्थायी तंबू ठोकला होता. खेळणी विकून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. रविवारीही ते नेहमी प्रमाणे फुटपाथवर झोपले होते. रस्त्याच्या बाजूला एक कार पार्क केलेली होती. दरम्यान वंश त्याच्या मित्रासह कारने फिरायला निघाला. कारमध्ये एकूण सहा मित्र होते. भूषण हा कार चालवीत होता. दारूच्या नशेत भरधाव वेगाने जात असताना अचानक कार अनियंत्रित झाली. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला धडक दिल्यानंतर भूषणची कार गोल फिरली व नंतर फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावरून चिरडत निघून गेली. या अपघातात पाच मुले, एक महिला आणि एक पुरुष असे नऊ जण जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.

तुकडे झालेल्या नंबर प्लेटवरून कारचा शोध-

घटनास्थळी कारच्या तुटलेल्या काचा व नंबर प्लेटचे तुकडे सर्वत्र पसरले होते. पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाठोडा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय दिघे हे सुद्धा पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल केले. पोलिस पथकाने अंधारात नंबर प्लेटचे तुकडे गोळा करीत कारचा नंबर मिळविला आणि अवघ्या दोन तासाच्या आत आरोपींना अटक केली. उमरेड रोडवरील टोल नाक्याजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कार कैद झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT