Nagpur Central Jail
Nagpur Central Jail  sakal
नागपूर

Nagpur : गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या ‘गृह’ नगरातील कारागृहात ‘सर्जिकल स्ट्राईक’ कधी ?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काही महिन्यांपूर्वी कारागृहात मोबाईल आणि बॅटरी सापडल्याची माहिती मिळताच, दुसऱ्या दिवशी अचानक शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृहात सर्जिकल स्ट्राईक करीत, तपासणी मोहीम राबविली. त्यानंतर आतापर्यंत अनेक प्रकरणे झालीत. प्रत्येक प्रकरणात कारागृह रक्षकांचा सहभाग असल्याचे दिसत असताना कारागृह प्रशासनाकडून कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे एकदा सर्जिकल केल्याशिवाय गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या ‘गृह’ नगरातील कारागृह सुरक्षित

कारागृहात ‘सर्जिकल स्ट्राईक’ कधी ?

कसे राहणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कारागृहातून २०१५ साली पाच कैदी फरार झाल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात चार कारागृह रक्षकही निलंबित करण्यात आले होते. सध्या कारागृहात मोठ-मोठे बंदिवान असल्याने नागपूर कारागृह हे सर्वाधिक संवेदनशील कारागृह समजले जाते.

अशावेळी वारंवार कारागृहात मोबाईल, बॅटरी, चार्जर आणि गांजा नेण्याची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून त्याबाबत कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे एकूणच प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा कारागृहावर सर्जिकल स्ट्राईक करीत, कैद्यांच्या बॅरेकसह सर्वच ठिकाणांची तपासणी आवश्‍यक आहे. गृहमंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेत कारवाईचे आदेश देण्याची आवश्‍यकता आहे.

एसीबी चौकशी होणार का?

कारागृहात यापूर्वी झालेल्या ‘जेल ब्रेक’ प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी लावण्यात आली होती. त्यातून कारागृहातील काळे कारनामे बाहेर आले होते. त्याचा अहवालही पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी गृहमंत्र्यांना पाठविला होता. त्यामुळे आता सातत्याने अशी प्रकरणे समोर येत असून त्यातून बरीच मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने त्याची एसीबी चौकशी होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हवे सक्षम नेतृत्व

कारागृहात गेल्या वर्षभरात किमान तीनदा कारागृह रक्षकांकडून आतमध्ये मोबाईल, बॅटरी, चार्जर आणि गांजा आतमध्ये जात आहे. दररोज येथील बंदीवानाला शंभर रुपयात गांजा मिळत असतो. याशिवाय काही दिवसांपूर्वी कारागृहात एका कैद्याने रक्षकावर हल्ला केल्याचीही बाब समोर आली होती. त्यामुळे ही प्रकरणे बंद करीत, कारागृहातील बंदीवानांवर वचक निर्माण करणारे सक्षम नेतृत्त्वाची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT