dilip walse patil Sakal
नागपूर

गृहमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला ‘पीडब्ल्यूडी’चा लाल कंदील

गृहमंत्री पोलिस विभागाच्या इमारतीच्या उद्‍घाटनासाठी नागपूरला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना नागपूर येथून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जायचे होते. मात्र बांधकाम विभागाने रामगिरीवरून उड्डाणास परवानगी नाकारल्याने त्यांच्या दौऱ्यात रात्री उशिरा बदल करण्यात आल्याचे समजते. बांधकाम विभागाच्या नव्या निकषानुसार हेलिपॅड सभोवतालचा २४३ मीटर परिसर मोकळा पाहिजे. तो येथे नसल्याने परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा जाणार होते.

गृहमंत्री पोलिस विभागाच्या इमारतीच्या उद्‍घाटनासाठी शुक्रवारला नागपूरला येत आहेत. त्यानंतर ते गडचिरोलीला जाणार आहेत. तेथील कार्यक्रम आटोपून लगेच नागपूरला परत येणार होते. याकरिता हेलिकॉप्टर सोयीचे होते. गृहमंत्री वळसे- पाटलांसाठी रविभवनचे कॉटेज क्रमांक ६ राखीव ठेवण्यात आले. रामगिरी येथे हेलिपॅडची व्यवस्था आहेच. येथूनच ते गडचिरोलीला रवाना होणार होते. तसा अधिकृत दौरा निश्चित करण्यात आला होता.

त्यासाठी पोलिस विभागाकडून बांधकाम विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला. परंतु, बांधकाम विभागाने येथून हेलिकॉप्टर उडविण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे पोलिस विभाग व प्रशासनामध्ये मोठा खळबळ उडाली. बांधकाम विभागाकडून यासाठी तांत्रिक कारण पुढे करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही येथून हेलिकॉप्टर उडाले आहे. त्यामुळे आताच नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. बांधकाम विभागाच्या नव्या निकषानुसार हेलिपॅड सभोवतालचा २४३ मीटर परिसर मोकळा पाहिजे. या नियमामुळे गृहमंत्र्यांना नागपूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT