Rahibai Popere sakal
नागपूर

Nagpur News : विज्ञान काँग्रेसमध्ये सन्मानजनक वागणूक - राहीबाई पोपेरे

आपल्या पत्रात राहीबाई म्हणतात, 'मला सन्मानजनक वागणूक मिळाली असून मला माझे म्हणणे या व्यासपीठावरून मांडता आले.

सम्राट कदम

नागपूर - भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये मोदी-शहा विरुद्ध बोलल्या म्हणून राहीबाई पोपेरे यांना थांबविण्यात आल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये चालू होत्या. त्यावर राहीबाईंचे स्पष्टीकरण आले आहे.

आपल्या पत्रात राहीबाई म्हणतात, 'मला सन्मानजनक वागणूक मिळाली असून मला माझे म्हणणे या व्यासपीठावरून मांडता आले. तरी माझा अवमान झाला, वा मला बोलू दिले नाही हे वृत्त निराधार आहे.' महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये पद्मश्री पोपेरे यांना आंमत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा येथे भेट देणाऱ्या वैज्ञानिक व विज्ञानाच्या अभ्यासकांना व्हावा हाच शुध्द हेतु होता. त्यानुसार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी महिला विज्ञान काँग्रेससह एकूण तीन आयोजनात सहभाग घेवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान पोपेरे यांना भाषण देण्यापासून थांबवण्यात आले नव्हते असे सांगत डॉ. पांडे यांनी पोपेरे यांनी पाठविलेले निवेदन पत्रकारांना दाखविले. यावेळी कुलगुरु डॉ सुभाष चौधरी आणि शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ. प्रकाश इटनकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT