Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : हुबळी-धारवाडच्या महापौरांची मनपाला भेट

सिटी ऑपरेशन सेंटरचे कौतुक : आयुक्तांनी केले स्वागत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कर्नाटकमधील हुबळी-धारवाडचे महापौर इरेश बी. अंचतगेरी यांच्यासह तेथील आयुक्त गोपाळकृष्ण बी. यांनी गुरुवारी नागपूर महापालिकेला भेट दिली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोघांचेही स्वागत केले. यावेळी पाहुण्यांनी स्मार्ट सिटीच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरची पाहणी केली. गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच पावसाळ्यात आपातकालीन स्थितीवर लक्ष ठेवण्याच्या प्रणालीचे त्यांनी कौतुक केले.

हुबळी-धारवाडचे महापौर इरेश बी. अंचतगेरी, आयुक्त गोपाळकृष्ण बी. यांनी सिटी ऑपरेशन सेंटरमधील गुन्हे नियंत्रणाबाबत माहिती जाणून घेतली. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी त्यांना विविध जनकल्याणकारी प्रकल्प व कामांची माहिती दिली. या सेंटरच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते.

शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये तपासासाठी पोलिस प्रशासनाला सिटी ऑपरेशन सेंटरची मोठी मदत होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे शहरात ३६०० पेक्षा जास्त कॅमरे लावण्यात आले आहेत. या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाते तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर लक्ष ठेवण्यास सुद्धा मदत होते. महापौर इरेश बी. अंचतगेरी यांनी स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि पावसाळ्यात कामे करण्याची प्रशंसा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख महेश धामेचा, स्मार्ट सिटीचे डॉ. शील घुले, स्वप्नील लोखंडे, कुणाल गजभिये आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT