नागपूर

Nagpur: गरीब कुटुंबाकडून घेतलं ८ महिन्यांचं बाळ दत्तक; दांपत्यावर गुन्हा दाखल, पत्नीनेच केला प्रकरणाचा खुलासा

Illegal Adoption Nagpur: नियमबाह्य पद्धतीने आठ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतल्या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Illegal adoption of Girl: नियमबाह्य पद्धतीने आठ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतल्या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळ ताब्यात घेत, बाल कल्याण समितीच्या सुपूर्द केले आहे. विशेष म्हणजे, पत्नीने केलेल्या तक्रारीवरूनच हे प्रकरण उघडकीस आले.


दिपेन होरीलाल मजुमदार आणि प्रीती दिपेन मजुमदार (रा.जरीपटका) असे दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दिपेन आणि त्याच्या पत्नीने पुण्यातील एका व्यक्तीच्या मदतीने तेथील एका गरीब कुटुंबाकडून आठ महिन्याचे बाळ दत्तक घेतले. त्यासाठी केवळ नोटरी करून त्यांनी बाळाचा ताबा घेतला.

मात्र, एका महिन्यातच दिपेन आणि प्रीती यांच्यात वाद सुरू झाला. त्या वादातून दिपेन यांनी लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या सोनल पटेल यांच्याकडे संगोपनासाठी दिले. दरम्यान प्रीती मजुमदार यांनी त्यांच्या घरी जाऊन बाळाची मागणी केली. मात्र, त्यांनी बाळ देण्यास स्पष्ट नकार देत, त्यांच्या पतीनेच बाळ संगोपनासाठी दिल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

त्यामुळे प्रीती यांनी पोलिस आयुक्तालय गाठून तिथे दत्तक घेतलेले बाळ असून त्याचा ताबा देण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी बजाजनगर पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपास करताना, सोनल पटेल यांना बोलावून विचारणा केली. त्यांनी याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रीती यांना बाळ दत्तक घेतल्याच्या कागदपत्रांची विचारणा केली.

त्यांनी नोटरी दाखविल्यावर पोलिसांनी बाळ दत्तक घेण्याच्या नियमांचा भंग केल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांनी बाळाचा देखरेखीसाठी त्याला बाल कल्याण समितीकडे पाठविले. याशिवाय पुण्यात त्यांच्या मूळ आईवडिलांना संपर्क करीत, त्यांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावून घेतले. तसेच नियमाचा भंग केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: राजकारणाचा खरा पाया कोणता? नरेंद्र मोदींनी दिलेले उत्तर चर्चेत, काँग्रेसवर आगपाखड करत नेमकं काय म्हणाले?

ST Bus: दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून २५० जादा फेऱ्यांचे नियोजन

Bihar Election 2025 : ‘NDA’ समोर मोठा पेच!, चिराग पासवान नंतर जीतनराम मांझीही जागांसाठी अडून बसले

पालिका कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 'जुनी पेन्शन योजना' पुन्हा लागू होणार; पालिका आयुक्तांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : दीपक खेडेकरांचा अटकपूर्व जामीन बेलापूर नायायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT