नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाटीत काटवल अर्थात कटुले ही वेलवर्गीय फळभाजीही येते. तिला चांगली मागणी असते. याच काटवलांनी भावाचा विक्रमी पल्ला गाठला आहे. काटवल तब्बल ८० ते ९० रुपये पाव, म्हणजे ३२० रुपये किलो अशा दराने विकले जात आहेत. धक्का बसला नाही, पण हे सत्य आहे.
पूर्वीपासून पावसाळ्यात काटवल नावाचे हे छोटे हिरवे फळ भाजी म्हणून खाण्याची परंपरा आहे. फार चविष्ट नसले, तरी अनेक आजारांवर लाभप्रद असल्याने या फळाची भाजी आवर्जून खाल्ली जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याने आरोग्यासाठी हितकारकच आहे. पूर्वी या फळभाजीला फार मागणी नव्हती. परंतु, आता नागरिकांचा ओढा नैसर्गिक उगवणाऱ्या वनस्पती, भाज्यांकडे वाढला आहे. सध्या हे फळ ८० ते ९० रुपये पाव म्हणजे ३५० रुपये किलो दराने विकले जात आहे.
हे आहेत औषधी उपयोग
डोकेदुखीत पानांचा रस, मिरे, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात
मूळव्याधीत रक्त पडत असेल तर कंदाचे चूर्ण देतात
कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहातही देतात
डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांतही कंदाचा वापर करतात.
आतड्यांसाठी उपयोगी
पाने कामोत्तेजक व कृमिनाशक असून ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी यात गुणकारी आहेत
फळ वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात उपयुक्त आहे
अतिलाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास, रक्तरोग, डोळ्यांचे रोग, धावरे या विकारातही वापरतात
भाजी पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे
मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्करा नियंत्रित होते.
चवीला तुरट
करटोली किंवा काटवल या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ‘कुकरबिटेसी’ म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. हिला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. ग्रामीण भागात अनेकांच्या अंगणात किंवा शेतात याचे वेल असतात. याच्या स्त्रीजातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात. कंद लंबगोलाकार, पिवळट-पांढरे असून त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची चव तुरट असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.