Inflation  
नागपूर

नागपूर : आता टाळ, मृदंगही महागले

कच्चा मालाच्या दरवाढीने भक्तीला फटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - स्टीलचे दर वाढल्याने टाळाचे दर वाढले आहेत. चामडे तसेच लाकूड उत्तर प्रदेश, गुजरात व तामिळनाडूमधून आणावे लागते. इंधन दरवाढीमुळे मृदंगाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे यावर्षी टाळ खरेदी करताना आणि मृदंगावर नव्याने शाई लावतानाही जरा अधिकचे पैसे मोजावे लागले. टाळेबंदीनंतर मृदंगासह विविध वाद्यांची निर्मिती व दुरुस्ती करणाऱ्यांसाठी ही वारी जराशी नफा देणारी आहे. कारण एका टाळाची किंमत ५५० रुपयांपर्यंत वाढली, तर साडेपाच हजार रुपयांपासून मिळणारे मृदंग आता दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत.

‘आता नमू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्यां माझे दंडवत’ असा नामदेवांचा अभंग कीर्तनी टाळ- मृदंगाचे महत्त्व सांगणारा. वारीला जाण्यापूर्वी तसेच हरिनाम सप्ताहाची तयारी सुरू होण्यापूर्वी वाद्य निर्मिती करणाऱ्यांची घाई सुरू असते. मोठय़ा शहरातील बहुतांश शाळांमध्येही स्वतंत्र संगीत विभाग आहेत. शहरात ३०० ते ३५० हून अधिक तबल्याचे शिकवणी वर्ग आहेत. वारी, स्वातंत्र्यदिनाच्या तयारीचा भाग म्हणून जुलैमध्ये मृदंग, टाळ याचबरोबर विविध वाद्यांच्या दुरुस्तीचा काळ सुरू होतो.

शहरात या व्यवसायातील आनंद सुतारे म्हणाले, ‘आता वारीचे काम तसे संपत आले आहे. कोरोनानंतर अनेक वस्तूंचे भाव वाढले तसे टाळ व मृदंगांचेही दर वाढले आहेत. यावर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिरसातील वारीमध्येही महागाईची झळ बसत आहे. या वर्षी दररोज एक नवा आणि पाच जुन्या मृदंगाचे काम करावे लागत असल्याचे वाद्य निर्मिती व दुरुस्ती क्षेत्रातील कलाकार सांगत आहेत. मस्कासाथ आणि भारत माता चौकात टाळ तयार करणाऱ्यांसह मृदंग, तबला तयार करणाऱ्यांची दुकाने आहेत.

सलग दोन वर्षानंतर या परिसरातील दुकांनामध्ये ग्राहकांची वर्दळ वाढलेली आहे. सलग दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी होती. परिणामी, आमचा व्यवसायही डबघाईस आला होता. आता व्यवसयाला चांगले दिवस आले असताना कच्चा मालाचे दर वाढलेले आहे. त्यामुळे ग्राहकही नवीन टाळ, मृदंग खरेदी करण्याऐवजी जुन्याच टाळांवर यंदाचे वर्ष काढण्याच्या तयारीत आहे. शहरातील वारीवर जाणाऱ्यांनी टाळ दुरुस्ती आता संपली आहे. सध्या धापेवाड्याला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने कामे करण्यात येत आहेत. तसेच ३० तारखेनंतर श्रावण महिना सुरु होत असून त्यातही व्यवसायाची चांगली संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT